उत्तर कोरियाने संयुक्त राष्ट्रांच्या र्निबध ठरावांकडे दुर्लक्ष करीत मध्यम पल्ल्याच्या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. सागरी क्षेत्रातून ही चाचणी करण्यात आल्याचे अमेरिका व दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी अमेरिकेवर अण्वस्त्रे टाकण्याचा इशारा यापूर्वीच दिला असून, त्यासाठी अण्वस्त्रवाहक क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. दक्षिण कोरियाच्या लष्करी अधिकाऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे, की उत्तर कोरियाने प्याँगयाँग या राजधानीच्या शहरापासून उत्तरेला असलेल्या ठिकाणाहून सोडलेले क्षेपणास्त्र ८०० किमी अंतर कापून पूर्व किनाऱ्यावरील ठिकाणी जाऊन पडले. या चाचणीनंतर उत्तर कोरियावर आणखी र्निबध लादले जाण्याची शक्यता कमी आहे.