News Flash

किम जोंग उन यांनी घेतली जिनपिंग यांची भेट; अण्वस्त्र प्रसारबंदीबाबत सकारात्मक चर्चा

कोरियन द्विपकल्पातील तणाव कमी होणार?

किम जोंग आणि क्षी जिनपिंग यांच्या भेटीचे छायाचित्रही प्रसारित करण्यात आले आहे.

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट घेतली. या भेटीत किम जोंग यांनी अण्वस्त्र प्रसारबंदीचा संकल्प केल्याचे वृत्त असून कोरियन द्विपकल्पात शांतता रहावी, याबाबतही दोन्ही राष्ट्रप्रमुखांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी चीनला गुप्त भेट दिल्याची चर्चा रंगली होती. किम जोंग हे विशेष रेल्वे ट्रेनने चीनला पोहोचल्याचे वृत्त होते. चीननेही किम जोंग उन यांच्या दौऱ्याबाबत कोणतीही माहिती नाही, असे म्हटले होते. जर ते चीन दौऱ्यावर असतील तर त्याची माहिती लवकरच प्रसारित केली जाईल, असे चीनच्या वतीने सांगण्यात आले होते.

चीनमधील वृत्तसंस्थेने अखेर किम जोंग उन यांच्या चीन दौऱ्याबाबत वृत्त दिले आहे. रविवारपासून किम जोंग उन तीन दिवसांच्या चीन दौऱ्यावर आहेत, असे वृत्तसंस्थेने म्हटले आहे. या दौऱ्यात किम जोंग यांनी अण्वस्त्र प्रसारबंदीचा संकल्पही केला. या मोबदल्यात चीनने उत्तर कोरियाशी संबंध सुधारण्याचे आश्वासन दिले. २०११ मध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर किम जोंग यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे.

किम जोंग आणि क्षी जिनपिंग यांच्या भेटीचे छायाचित्रही प्रसारित करण्यात आले आहे. चीन हा उत्तर कोरियाचा मित्र देश आहे. मात्र, किम जोंग यांच्या अण्वस्त्र मोहीमेमुळे उत्तर कोरियावर निर्बंध टाकण्यासाठी चीनवरील दबाव वाढत होता. शेवटी चीनने उत्तर कोरियावरील निर्बंधांची अंमलबजावणी केली असून त्यात तेल व कोळसा निर्बंधांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

कोरियन द्विपकल्पातील तणाव कमी करण्यासाठी किम जोंग यांनी सुरु केलेल्या प्रयत्नांची माहिती या भेटीत देण्यात आली. आगामी काळात किम जोंग हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची देखील भेट घेणार आहे. ‘अमेरिका आणि दक्षिण कोरियाने आम्हाला सकारात्मक प्रसाद दिल्यास कोरियन द्विपकल्पातील अण्वस्त्रांच्या प्रश्नावर तोडगा निघू शकतो’, असे किम जोंग यांनी म्हटले आहे. किम जोंग यांच्यासोबत त्यांची पत्नी देखील चीन दौऱ्यावर आली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2018 8:16 am

Web Title: north korea leader kim jong un meet china president xi jinping talks on denuclearization
टॅग : Kim Jong Un
Next Stories
1 भारतातही होते केंब्रिज अॅनालिटिकाचे कार्यालय; व्हिसलब्लोअरने काँग्रेसचेही घेतले नाव
2 जम्मू-काश्मीरसंबंधी ३७० कलम रद्द करण्याचा विचार नाही- अहिर
3 कर्नाटकचा निकाल देशाच्या राजकारणाला कलाटणी देणार
Just Now!
X