News Flash

उत्तर कोरियात किम जोंग-उन यांच्या ‘अॅम्बिशिअस’ केशरचनेचे अनुकरण बंधनकारक

या हुकूमाचे पालन न करणाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

कारवाईच्या भीतीने कोरियातील अन्य नागरिक केशकर्तनालयांसमोर रांगा लावताना दिसत आहेत.

उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग-उन यांच्याकडून देशातील महिला आणि पुरूषांच्या केशरचनेसंदर्भात अजब फतवा काढण्यात आला आहे. या निर्णयानुसार देशातील पुरूषांना किमजोंग-उन यांच्याप्रमाणेच केशरचना ठेवावी लागणार आहे, तर महिलांना किम जोंग-उन यांच्या पत्नीच्या केशरचनेचे अनुकरण करणे बंधनकारक राहणार आहे. या हुकूमाचे पालन न करणाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. उत्तर कोरियाची राजधानी असणाऱ्या प्योगाँगमधील सूत्रांनी दक्षिण कोरियाचे राष्ट्रीय वृत्तपत्र असलेल्या ‘चोसून इल्बो’ला यासंदर्भातील माहिती दिली आहे. या माहितीनुसार आता उत्तर कोरियातील पुरूषांना त्यांच्या केसांची लांबी २ सेंटिमीटरपर्यंत मर्यादित ठेवावी लागणार आहे. उत्तर कोरियातील विद्यापीठांमध्येही निरीक्षक कात्री घेऊन फिरत आहेत आणि हा कायदा न पाळणाऱ्यांचे केस कापत आहेत. तर दुसरीकडे, कारवाईच्या भीतीने कोरियातील अन्य नागरिक केश कर्तनालयांमध्ये रांगा लावताना दिसत आहेत.
‘अॅम्बिशिअस’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या केशरचनेत पुरूषांना डोक्याच्या दोन्ही बाजूंचे आणि मागील भागातील केस बारीक करण्यात येणार असून फक्त वरच्या भागातील केसांची लांबी जास्त ठेवता येईल. तर महिला आणि मुलींना किम जोंग-उन यांची पत्नी रि सोल-जु यांच्याप्रमाणे केसांचा बॉबकट करावा लागणार आहे. या कायद्यातून फक्त कलावंतांना सूट देण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2015 3:16 pm

Web Title: north koreans will now have to copy kim jong un ambitious hairstyle
टॅग : Fashion
Next Stories
1 ब्रिटनमधील सुरक्षेसाठी आयसिसच्या तळांवर हल्ले गरजेचे – कॅमेरून
2 ‘धर्माच्या आधारावर दुजाभाव केला जाऊ नये हेच आंबेडकरांना अपेक्षित होते’
3 ‘आप’च्या पाचव्या आमदाराला दिल्ली पोलिसांकडून अटक
Just Now!
X