उत्तर कोरियाने मंगळवारी क्षेपणास्त्र सोडण्याचा प्रयत्न केला पण तो फसला. त्यांची अमेरिकेविरोधात आंतरखंडीय क्षेपणास्त्र चाचण्या करण्याची मोहीम सुरूच असून त्यातील अनेक चाचण्या अपयशी ठरल्या आहेत. दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने पहाटे या क्षेपणास्त्र चाचणीचा प्रयत्न करून पाहिला, जपानने ही प्रक्षोभक कृती असल्याचे म्हटले आहे. क्षेपणास्त्र कुठल्या प्रकारचे होते हे समजले नसले, तरी स्थानिक प्रसारमाध्यमांच्या मते ते मध्यम पल्ल्याचे मुसुदान नावाचे क्षेपणास्त्र होते व या वर्षी त्याची तीन उड्डाणे अपयशी झाली होती. संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार उत्तर कोरियावर आंतरखंडीय क्षेपणास्त्र तंत्रज्ञान वापरण्यास बंदी आहे. अनेकदा पूर्व किनाऱ्यावर उत्तर कोरियाने कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्र्यांच्या चाचण्या केल्या आहेत.