News Flash

शनिच्या उत्तर गोलार्धातील भाग सूर्यप्रकाशात

शनिच्या कडय़ांच्या प्रतलात ५१ अंशावर काही कडी सूर्यप्रकाशाच्या भागात दिसतात.

| January 3, 2017 01:39 am

नासाच्या कॅसिनी अवकाशयानाने घेतलेल्या छायाचित्रानुसार शनिच्या उत्तर भागात मोठय़ा प्रमाणात सूर्यप्रकाश पडत असल्याचे दिसून आले आहे. कडी असलेल्या या ग्रहाचा उत्तर भाग सूर्यप्रकाशात न्हाऊन निघतो आहे. २०१६ मध्ये १२ लाख किलोमीटर अंतरावरून घेतलेल्या छायाचित्रात अष्टकोनाकार जेट प्रवाह दिसत असून. त्यामुळे शनिचा हा भाग प्रकाशित झालेला दिसतो. जिथे ढग खाली आलेले आहेत अशा ठिकाणी अंधार आहे. शनिवरील ऋतुमानाचा फायदा घेऊन कॅसिनी यानाने अनुकूल अवस्थेत छायाचित्रे टिपली आहेत. उत्तर अर्धगोलार्धात उन्हाळा असल्याने तेथे सूर्यप्रकाश जास्त दिसून आला आहे.

शनिच्या कडय़ांच्या प्रतलात ५१ अंशावर काही कडी सूर्यप्रकाशाच्या भागात दिसतात. कॅसिनी यानाने विस्तृत कोनाच्या कॅमेऱ्यातून ९ सप्टेंबर २०१६ रोजी छायाचित्र घेतले होते, त्यात स्पेक्ट्रल फिल्टरचा वापर करण्यात आला होता. या फिल्टरमुळे ७२८ नॅनोमीटर तरंगलांबीचे अवरक्त किरण कॅमेऱ्यात प्रवेश करू शकतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2017 1:39 am

Web Title: northern hemisphere part of saturn in the sun
Next Stories
1 भारत एकाचवेळी पाकिस्तान आणि चीनशी युद्ध करण्यास सक्षम- लष्करप्रमुख
2 ‘अशा घटना होतच राहतात’, महिलांशी असभ्य वर्तन प्रकरणाबाबत गृहमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
3 जम्मू काश्मीर विधानभवनात संयुक्त सत्रामध्ये राष्ट्रगीत सुरू असतानाच गदारोळ
Just Now!
X