News Flash

पाकिस्तानच्या अण्वस्त्र धमक्यांना भारत घाबरत नाही- जितेंद्र सिंग

पाकिस्तान अण्वस्त्रांच्या मदतीने पाच मिनिटांत दिल्लीचा वेध घेऊ शकतो

| June 2, 2016 12:05 am

पाकिस्तान अण्वस्त्रांच्या मदतीने पाच मिनिटांत दिल्लीचा वेध घेऊ शकतो, या त्या देशाचे अणुशास्त्रज्ञ अब्दुल कादिर खान यांच्या धमकीला आम्ही घाबरत नाही, असे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी म्हटले आहे. पाकिस्तानच्या कुठल्याही आगळिकीचा सामना करण्याची धमक आमच्यात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. अब्दुल कादिर खान यांनी पाकिस्तानच्या अणुचाचण्यांच्या वर्धापनदिनी झालेल्या कार्यक्रमात दिल्लीला लक्ष्य करण्यास आम्हाला पाच मिनिटेही लागणार नाहीत अशी दर्पोक्ती केली होती.
काश्मिरी पंडितांबाबत विचारलेल्या प्रश्नावर जितेंद्र सिंग यांनी असे म्हटले आहे, की केंद्र सरकार पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असून, काश्मिरी पंडितांना काश्मीरमध्ये परत आणून त्यांचे पुनर्वसन करण्यात येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2016 12:05 am

Web Title: not afraid of pakistan nuclear threat jitendra singh
टॅग : Pakistan
Next Stories
1 ‘राहुल गांधींना काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदी बसवणे हे घराणेशाहीचे बोलके उदाहरण’
2 बुद्ध मंदिरातील फ्रीजमध्ये सापडले वाघाच्या ४० बछड्यांचे मृतदेह!
3 लता मंगेशकर तथाकथित गायिका, ‘दी न्यूयॉर्क टाइम्स’ने उडवली खिल्ली
Just Now!
X