17 November 2017

News Flash

२६/११ तील आरोपी डेव्हिड हेडलीला ३५ वर्षांची शिक्षा

मुंबईवर झालेल्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्यातील महत्त्वाचा आरोपी आणि लष्कर- ए- तय्यबाचा दहशतवादी डेव्हिड हेडली

शिकागो | Updated: January 25, 2013 5:10 AM

मुंबईवर झालेल्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्यातील महत्त्वाचा आरोपी आणि लष्कर- ए- तय्यबाचा दहशतवादी डेव्हिड हेडली याला मंगळवारी अमेरिकेतील शिकागो कोर्टाने मुंबईतील हल्ल्याप्रकरणी ३५ वर्षांची शिक्षा सुनावली. ३५  वर्षांच्या शिक्षेनंतर त्याला मुक्त करण्यात येणार आहे मात्र त्याच्यावर आजीवन देखरेख ठेवण्यात येणार आहे. अमेरिकेच्या ताब्यात असलेल्या हेडली व त्याचा आणखी एक साथीदार तहव्वूर राणा याच्यावर डेन्मार्क येथील एका वृत्तपत्रावर हल्ला केल्याचाही आरोप आहे.  
हेडली याने मुंबईत झालेल्या २६ /११ च्या हल्ल्यासाठी मुंबई शहराची रेकी तयार करून हल्ल्याचा संपूर्ण कट आखला होता. अमेरिकेचा नागरिक असल्याचे सांगत त्याने बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानाची छायाचित्रे काढली, तसेच तेथील सुरक्षा यंत्रणेचा अंदाज घेतला होता.  हेडली पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय.एस.आय, पाकिस्तानी दहशतवादी संस्था लष्कर – ए- तय्यबा आणि अमेरिकी गुप्तचर संस्था या तिघांसाठी एकाचवेळी काम करीत होता. मंगळवारी न्यायाधीश हॅरी डी लेनेनवेबर यांनी शिकागो येथील न्यायालयामध्ये हेडलीला शिक्षा सुनावली.

First Published on January 25, 2013 5:10 am

Web Title: not death david headley gets 35 year jail term in us court