संसदेत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या गदारोळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले असून, विरोधकांवर कोरडे ओढले आहे. लोकशाही कोणा एकाच्या मर्जी आणि आवडीवर चालू शकत नाही. गदारोळामुळे देशातील गरिबांचे नुकसान होत आहे, असे मोदी म्हणाले. दिल्लीत ‘जागरण मंच’ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
संसदेत केवळ जीएसटी विधेयक नाही, तर देशातील गरिबांच्या हिताशी संबंधित अनेक महत्त्वाची कामं रखडली आहेत. गोंधळामुळे संसदेचे कामकाज होत नसल्याने मी अतिशय दु:खी आहे. विकासासाठी खाजगी, वैयक्तिक आणि सार्वजनिक क्षेत्रांना चालना देण्याची गरज असून, आमच्या सरकारच्या कार्यकाळात आम्ही दररोज एक कायदा कमी करण्याच्या विचारात आहोत. फक्त आपल्या कर्तव्यांचे पालन करून सरकारच्या प्रयत्नांना सर्वसामान्य नागरिकांनी साथ द्यावी, अशी अपेक्षा असल्याचेही मोदींनी सांगितले.