News Flash

VIDEO: हिंदू नाही वाटत, भारतीय शास्त्रज्ञाला अमेरिकेत गरब्याच्या कार्यक्रमातून काढले बाहेर

आडनावावरुन हिंदू वाटत नसल्यामुळे एका ख्यातनाम भारतीय शास्त्रज्ञाला अमेरिकेतील गरबा कार्यक्रमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

आडनावावरुन हिंदू वाटत नसल्यामुळे एका ख्यातनाम भारतीय शास्त्रज्ञाला अमेरिकेतील गरबा कार्यक्रमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याची घटना समोर आली आहे. अटलांटा येथील श्री शक्ती मंदिरात अमेरिकेतील गुजराती समुदायाकडून गरब्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आडनाव हिंदू वाटत नसल्याच्या कारणावरुन करण जानी (२९) या युवा शास्त्रज्ञाला आणि त्याच्या तीन मित्रांना गरब्यातून बाहेर काढण्यात आले.

करण जानी यांनी त्यांच्या टि्वटर आणि फेसबुक अकाऊंटवरुन या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला आहे. शुक्रवारी त्यांच्याबरोबर हा प्रकार घडला. करण जानी मूळचे वडोदऱ्याचे असून ते आता अमेरिकेत स्थायिक झाले आहेत.

मागच्या सहावर्षांपासून मी शक्ती मंदिरात गरबा खेळण्यासाठी येत आहे. पण यापूर्वी असा प्रकार कधीही घडलेला नाही. मी आयोजकांबरोबर गुजरातीमध्ये बोललो पण ते काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हते. करण जानी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या घटनेचा व्हिडिओ शेअर करताना वर्ष २०१८ मध्ये अटलांटामधील शक्ती मंदिरात मला आणि माझ्या मित्रांना गरबा खे्ळू दिला नाही असे म्हटले आहे. ओळखपत्रावरील शेवटच्या नावावरुन तुम्ही हिंदू वाटत नाही असे आयोजकांचे म्हणणे होते. माझ्या एका मित्राने तिथल्या स्वयंसेवकाला ओळखपत्र दाखवले त्यावेळी त्याने तुमच्या आडनावात ‘वाला’ आहे. तुम्ही हिंदू वाटत नाही असे त्याला सांगण्यात आले.

जानी यांची एक मैत्रिण कोकणी आहे. ती पहिल्यांदाच गरबा खेळण्यासाठी आली होती. जेव्हा तिने सांगितले माझे शेवटचे नाव मुरदेश्वर आहे. मी कन्नड-मराठी आहे तेव्हा स्वंयसेवकाने तिला विचारले कन्नड काय आहे ? तू इस्मायली आहेस. आम्ही तुमच्या कार्यक्रमाला येत नाही. तुम्हाला आमच्या कार्यक्रमांना परवानगी नाही असे एक स्वयंसेवक म्हणाला.

माझ्या १२ वर्षातील अमेरिकेतील वास्तव्यात अमेरिकन नागरिकांकडूनही मला कधी अशी भेदभावपूर्ण वागणूक मिळालेली नाही असे जानी यांनी सांगितले. करण जानीला नंतर मंदिर व्यवस्थापनाने फोन केला होता. स्वत: मंदिराच्या अध्यक्षांनी त्याची माफी मागितली. स्वयंसेवकांच्या गैरसमजुतीमुळे हे सर्व घडले. मंदिराकडून कधीही कोणाला अशी भेदभावपूर्ण वागणूक दिली नाही असे त्यांनी जानीला सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2018 10:55 am

Web Title: not looking hindu surname indian scientist thrown out of us garba event
Next Stories
1 भर वर्गात विद्यार्थ्यांसमोर मुख्याध्यापकांची हत्या
2 सिद्धूंनी पाकिस्तानच्या कॅबिनेटमध्ये सहभागी झाले पाहिजे’
3 हरयाणातील मशिदीला हाफीज सईदच्या ‘लष्कर- ए- तोयबा’ची रसद
Just Now!
X