गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या जागांचे कल हाती आले आहेत. दोन्ही राज्यांमध्ये मजमोजणी सुरू आहे. दोन्ही राज्यांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळण्याचे चिन्ह दिसत आहे. गुजरातमध्ये भाजपचा विजय जवळपास निश्चित झाला आहे तर हिमाचल प्रदेशातही भाजपचे कमळ फुलणार आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर असताना, प्रत्येक पक्षासाठी एक-एक मत बहुमूल्य ठरत आहे. यामध्ये नोटाचा आकडा आश्चर्यचकित करणारा आहे.

नोटाच्या आकड्यांवर नजर टाकल्यास १.८ टक्के म्हणजेच सुमारे चार लाखांहून अधिक मतदारांनी कोणत्याही उमेदवाराला मत दिले नाही. ४,४५,०३७ मतदारांनी भाजप किंवा काँग्रेस उमेदवारांना मत न देता NOTA चे बटण दाबले आणि निश्चितच हा मोठा आकडा आहे.

Gujarat Election results 2017 : सोशल मीडियावरही गुजरात विधानसभा निवडणुकांचे पडसाद

सध्याच्या घडीला भाजपने ९९ जागांची आघाडी गुजरातमध्ये घेतली आहे. तर काँग्रेसने ७० पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे. हिमाचलमध्येही भाजपने काँग्रेसला पिछाडीवर टाकत विजय मिळवला आहे.

वाचा : भाजपचा विजय म्हणजे राहुल गांधींना मिळालेली खास भेट- परेश रावल