08 March 2021

News Flash

‘अन्नसुरक्षे’त नवीन काहीच नाही’

बाली येथे ३ ते ६ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या जागतिक व्यापार संघटनेच्या परिषदेच्या पाश्र्वभूमीवर केंद्रीय अन्नमंत्री के. व्ही. थॉमस यांनी अन्नसुरक्षा योजनेची पुन्हा एकदा भलामण केली आहे.

| November 29, 2013 12:22 pm

बाली येथे ३ ते ६ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या जागतिक व्यापार संघटनेच्या परिषदेच्या पाश्र्वभूमीवर केंद्रीय अन्नमंत्री के. व्ही. थॉमस यांनी अन्नसुरक्षा योजनेची पुन्हा एकदा भलामण केली आहे. ही योजना म्हणजे केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांचेच विस्तारित अंग असल्याचे थॉमस यांनी स्पष्ट केले. भारताची अनुदानाबाबत भूमिका काय या प्रश्नाचे उत्तर देताना, अन्नधान्यासाठी दिली जाणारी अनुदाने अखंडित सुरू आहेत. नव्याने ही अनुदाने दिली जाणार नाहीत, असे थॉमस यांनी स्पष्ट केले. ‘स्वस्त धान्यवाटप’ दुकानांच्या माध्यमातून अनुदानित दरात गरीब लोकांना धान्यपुरवठा आजवर होतच होता, असे केंद्र सरकार परिषदेसमोर मांडणार असल्याचे थॉमस यांनी सांगितले.
अन्नसुरक्षा योजना राबवायची तर केंद्र सरकारला जागतिक व्यापार परिषदेने घालून दिलेल्या अनुदानाच्या मर्यादांचे उल्लंघन करावे लागणार असल्याने भारत सरकारची ही योजना अंमलबजावणीआधीच संकटात सापडली आहे. येत्या बाली परिषदेत या मुद्दय़ावर चर्चा होणे अभिप्रेत असून त्या पाश्र्वभूमीवर थॉमस यांच्या वक्तव्याकडे पाहिले जात आहे.
दरम्यान, अन्नसुरक्षा विधेयकासह अन्य व्यापारविषयक बाबींवर चर्चा करण्यासाठी गुरुवारी उशिरा केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. आगामी बाली परिषदेत मांडण्यात येणाऱ्या ‘व्यापार सुलभीकरण करारा’स (ट्रेड फॅसिलिटेशन अॅग्रीमेंट) भारत पाठिंबा देण्याची शक्यता धूसर आहे. जागतिक व्यापारी संघटनेने ‘अनुदनास अपात्र’ ठरविलेल्या घटकांच्या यादीस भारताचा आक्षेप आहे. या यादीतून अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत दिले जाणारे घटक वगळले जावेत, अशी भारताची मागणी असल्याने या कराराचे भारत समर्थन करणार नाही, असे म्हटले जात आहे.
आजवर हे अनुदान होतेच मात्र आता, त्याचे परिमाण बदलले असून अन्न उपलब्ध होणे हा हक्क असल्याचे सरकारचे मत असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2013 12:22 pm

Web Title: nothing new in food security bill
टॅग : Food Security Bill
Next Stories
1 मलाला इंग्लंडमधील प्रभावशाली आशियाई
2 भाजप भ्रष्टाचारात वस्ताद -राहुल गांधी
3 मोदींच्या सभेसाठी जम्मूमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
Just Now!
X