उपराष्ट्रपतींच्या पत्नी सलमा यांचे मत

योगासने करताना वैदिक मंत्र म्हणण्यावरून सध्या वाद निर्माण झालेला असतानाच ओम म्हणण्यात काहीच गैर नसल्याचे मत उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या पत्नी सलमा अन्सारी यांनी व्यक्त केले आहे. ओम म्हटल्याने अधिक प्राणवायू मिळतो, असे त्या म्हणाल्या.

योग दिवसाच्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांना ओम म्हणण्याचा आग्रह करणे हा केंद्र सरकारचा हिंदुत्वाचा कार्यक्रम रेटण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला जात आहे, त्या पाश्र्वभूमीवर सलमा अन्सारी यांनी वरील मत व्यक्त केले आहे. अलनूर धर्मादाय सोसायटी संचालित मदरसा अलनूर स्कूलच्या विद्यार्थ्यांचा सत्कार अन्सारी यांच्या हस्ते करण्यात आला तेव्हा त्या बोलत होत्या.

तुम्ही गॉड, अल्ला, रब म्हणता, त्यामध्ये काय फरक आहे, ओम म्हणणे गैर नाही, ओम म्हणतो तेव्हा अधिक प्राणवायू मिळतो, ओम पठणाने आरोग्य सुधारते त्यामुळे योगाला विरोध करणे चुकीचे आहे, असेही त्या म्हणाल्या.