News Flash

“दोन दिवसात उत्तर द्या अन्यथा…”, सचिन पायलट यांना काँग्रेस पक्षाची नोटीस

काँग्रेसकडून सचिन पायलट यांच्यासह १८ सदस्यांना नोटीस

संग्रहित

सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री तसंच प्रदेशाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी करण्यात आल्यानंतर काँग्रेस पक्षाकडून त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाकडून बोलावण्यात आलेल्या विधिमंडळ पक्ष बैठकांना गैरहजर राहिल्याने सचिन पायलट यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. सचिन पायलट यांच्या बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या १८ जणांना नोटीस पाठवण्यात आली असून दोन दिवसात उत्तर देण्यास सांगण्यात आल आहे. अन्यथा विधिमंडळ पक्षाचं सदस्यत्व रद्द केलं जाणार आहे. राजस्थानमधील काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडे यांनी ही माहिती दिली आहे.

अविनाश पांडे यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं आहे की, “सचिन पायलट आणि इतर १८ सदस्यांना विधिमंडळ बैठकीला अनुपस्थित राहिल्याने नोटीस पाठवण्यात आली आहे. जर त्यांनी दोन दिवसांत उत्तर दिलं नाही तर विधिमंडळ पक्षातून आपलं सदस्यत्व रद्द करत आहेत असं समजलं जाईल”.

आणखी वाचा- “पाच वर्ष पक्षासाठी झटलो, पण गेहलोत मुख्यमंत्री झाले”, सचिन पायलट यांनी व्यक्त केली जाहीर नाराजी

आणखी वाचा- भाजपा प्रवेशावर सचिन पायलट यांनी जाहीर केली भूमिका, म्हणतात…

“देव सचिन पायलट यांना शहापपणा देवो, आणि त्यांनी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करु नये. त्यांना आपली चूक मान्य करावी. सचिन पायलट यांना चर्चा करण्यासाठी दरवाजे नेहमी खुले होते, आजही आहेत. पण आता गोष्टी फार पुढे गेल्या आहेत. आता त्यांचा काही फायदा होणार नाही,” असंही अविनाश पांडे यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 11:32 am

Web Title: notice issued to sachin pilot and 18 other party members for not attending congress legislative party meetings sgy 87
Next Stories
1 भारताच्या जागतिक धोरणाची लक्तरे झालीयेत; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका
2 …म्हणून मी बंड पुकारलं, सचिन पायलट यांनी पहिल्यांदाच केलं जाहीर भाष्य
3 भाजपा प्रवेशावर सचिन पायलट यांनी जाहीर केली भूमिका, म्हणतात…
Just Now!
X