‘आयसिस’ दहशतवादी ब्रिटनमधील खासदारांना व त्यांच्या कर्मचाऱ्यांना एकटे गाठून त्यांच्यावर हल्ला करू शकतात, अशी भीती व्यक्त होत असल्यामुळे, खासदारांनी त्यांच्या घरातील आणि मतदारसंघातील सुरक्षाव्यवस्थेत वाढ करावी, असे त्यांना सांगण्यात आले आहे.
सरकारी अधिकाऱ्यांना मारण्याच्या उद्देशाने काम करणारे आयसिसचे एक राजकीय हत्या पथक असून, सीरियात बाँबहल्ल्यांची मोहीम राबवणाऱ्यांनी आता ब्रिटनकडे लक्ष वळवले असल्याचे वृत्त ‘संडे एक्स्प्रेस’ने दिले आहे. ३०० संशयित इस्लामी दहशतवादी ब्रिटनला परतले असून ते रस्त्यावर मोकळे फिरत असल्यामुळे त्यांच्याकडून थेट धोका असल्याचा इशारा सुरक्षाप्रमुखांनी दिला आहे. दहशतवाद्यांच्या दृष्टीने खासदार हे योग्य लक्ष्य आहेत. सीरियातून परतलेले ब्रिटिश जिहादी आहेत, अशा महानगरांमधील मंत्र्यांना खबरदार राहण्याची आवश्यकता आहे. हिंसाचाराची धमकी वा जे सरकारला त्याची प्रमुख धोरणे बदलण्यास भाग पाडतात अशा लोकांविरुद्ध प्रत्यक्ष हिंसाचार अशी ‘दहशतवादी हल्ल्याची’ व्याख्या आहे.