15 July 2020

News Flash

‘एनआयए’च्या आव्हान याचिकेवर नवलाखा यांना नोटीस

पुढील सुनावणी दोन आठवडय़ांनंतर

संग्रहित छायाचित्र

 

भीमा कोरेगाव प्रकरणी दिल्लीतील विशेष न्यायालये व मुंबईतील न्यायालयात करण्यात आलेल्या न्यायालयीन कामकाजाच्या नोंदी सादर करण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशावर  राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने नागरी हक्क कार्यकर्ते गौतम नवलाखा यांना म्हणणे मांडण्यास सांगणारी नोटीस जारी केली आहे.

न्या.अरुण मिश्रा, न्या. एस. ए नझीर व न्या. इंदिरा बॅनर्जी यांच्यापुढे ही सुनावणी झाली. त्यांनी अलीकडेच दिल्लीच्या तिहार तुरुंगातून मुंबईला नेलेले नागरी हक्क कार्यकर्ते नवलाखा यांना नोटीस जारी करून याबाबत पुढील सुनावणी दोन आठवडय़ांनी ठेवली आहे.

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, २७ मे रोजी उच्च न्यायालयाने असा आदेश जारी केला होता की, मुंबई व दिल्लीतील न्यायालयात झालेल्या कामकाजाच्या नोंदी सादर कराव्यात, पण हा आदेश त्यांच्या न्यायकक्षेबाहेरचा आहे.

उच्च न्यायालयाने राष्ट्रीय तपास संस्थेवर नवलाखा यांना घाईने दिल्लीहून मुंबईला नेण्याच्या कृतीबाबत ताशेरे ओढले होते. ईदची राजपत्रित सुटी असताना ईमेलवर आदेश तयार करून नवलाखा यांना मुंबईला नेण्याचे काही कारण नव्हते. त्यामुळे हे जे काही आदेश जारी केले गेले ते योग्य नव्हते.

नवलाखा यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार १४ एप्रिलला राष्ट्रीय तपास संस्थेसमोर शरणागती पत्करली होती. त्यानंतर त्यांना तिहार तुरुंगात ठेवण्यात आले. नंतर २६ मे रोजी रेल्वेने मुंबईला नेण्यात आले.

गौतम नवलाखा यांना मुंबईला नेण्याची एनआयएला कुठली घाई होती, अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली होती. एनआयएला अंतरिम जामीन अर्जावर स्थितीदर्शक अहवाल सादर करण्यास पुरेसा वेळ दिलेला होता. राष्ट्रीय तपास संस्थेने या जामीन अर्जाला विरोधही केला होता.

नवलाखा यांना पुणे पोलिसांनी ऑगस्ट २०१८ मध्ये दिल्ली येथील निवासस्थानी १ जानेवारी २०१८ मधील भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटक केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2020 12:13 am

Web Title: notice to navlakha on nias challenge petition abn 97
Next Stories
1 हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी लष्कर तैनातीचा ट्रम्प यांचा इशारा
2 जेसिका लाल हत्याकांडातील आरोपी मनु शर्माची तिहार तुरुंगातून मुक्तता
3 दिल्ली भाजपा अध्यक्षपदावरुन मनोज तिवारींची उचलबांगडी
Just Now!
X