जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती असणाऱ्या डायना मॅनफ्रेडिनी या अमेरिकी स्त्रीचे निधन झाल्याने हा मान आता जपानमधील ११५ वर्षीय जिरोमॉन किमुरा यांना लाभला आहे. डायना त्यांच्यापेक्षा केवळ १५ दिवसांनी मोठय़ा होत्या.
डायना यांच्या पश्चात किमुरा हे सर्वात वयोवृद्ध व्यक्ती असल्याचे अनौपचारिकरीत्या घोषित करण्यात आले. हा सन्मान लाभल्याबद्दल योटँगोचे महापौर यासुशी नाकायामा यांनी किमुरा यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार केला. किमुरा हे आमच्या शहरासाठी गौरवाचे स्थान आहेत, अशी भावना नाकायामा यांनी व्यक्त केली. १९ एप्रिल १८९७ या दिवशी जन्मलेले किमुरा टपाल खात्याच्या सेवेतून निवृत्त झाले आहेत.