News Flash

Good News: ऑक्सफर्ड पाठोपाठ नोव्हाव्हॅक्सने सिरमसोबत केला लस पुरवठ्याचा करार

नोव्हाव्हॅक्सच्या लसीचेही चांगले रिझल्ट...

Good News: ऑक्सफर्ड पाठोपाठ नोव्हाव्हॅक्सने सिरमसोबत केला लस पुरवठ्याचा करार

करोना व्हायरस विरोधात विकसित केलेल्या लसीचा पुरवठा आणि परवाना देण्यासंदर्भात नोव्हाव्हॅक्स बायोटेक या कंपनीने भारताच्या सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियासोबत करार केला आहे. नोव्हाव्हॅक्सने बुधवारी ही माहिती दिली. नोव्हाव्हॅक्स अमेरिकन लस उत्पादक कंपनी आहे.

या करारामुळे नोव्हव्हॅक्सच्या भारतातील लस उत्पादनाचे सर्वाधिकार सिरमकडे असणार आहेत. नोव्हाव्हॅक्सच्या एसईसी फाईलनुसार, ३० जुलै रोजी हा करार झाला. नोव्हाव्हॅक्सने विकसित केलेल्या लसीचे प्राथमिक स्तरावर अपेक्षित निकाल मिळाले आहेत. सप्टेंबरपासून नोव्हाव्हॅक्स तिसऱ्या फेजची चाचणी सुरु करेल. रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे.

ऑपरेशन वार्प स्पीड अंतर्गत अमेरिकेने करोनावरील लस निर्मितीसाठी नोव्हाव्हॅक्स बायोटेक या कंपनीला १.६ अब्ज डॉलर्सचा निधी देण्याची घोषणा केली होती. एखाद्या कंपनीला लस निर्मितीसाठी देण्यात येणारा आतापर्यंतचा हा सर्वाधिक निधी आहे. अमेरिकेने अन्य कंपन्यांना सुद्धा करोनावरील लस निर्मितीसाठी निधी दिला आहे.

नोव्हाव्हॅक्स प्रमाणे सिरमकडे ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लसीचे उत्पादन आणि पुरवठयाचे अधिकार आहेत. भारतात लवकरच सिरमकडून ऑक्सफर्डच्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फेजच्या चाचण्या सुरु होतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 9:55 am

Web Title: novavax signs covid 19 vaccine supply deal with indias serum institute dmp 82
Next Stories
1 मनोज सिन्हा जम्मू काश्मीरचे नवे उपराज्यपाल
2 चीन : वुहानमधून समोर आली धक्कादायक बातमी; करोनामुक्त झालेल्या ९० टक्के रुग्णांच्या फुफ्फुसावर गंभीर परिणाम
3 अहमदाबादमधील कोविड रुग्णालयाला आग; ८ रुग्णांचा मृत्यू
Just Now!
X