News Flash

Novavax Vaccine करोनाविरोधात ९० टक्के प्रभावी असल्याचा दावा!

लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचंही कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

Novavax Vaccine 90% effective against Corona
कंपनीने अमेरिकेत मोठ्याप्रमाणावर संशोधन केल्यानंतर लस प्रभावी असल्याचे सांगितले आहे

जगभरात वर्षभरापेक्षा जास्त काळापासून करोना महामारीने थैमान घातलेलं आहे. या महामारीमुळे जगभरात लाखो लोकांना जीव गमावावा लागलेला आहे. जगभरातील शास्त्रज्ञ या महामारीला रोखण्यासाठी जास्तीत जास्त परिणामकारक ठरणाऱ्या लस निर्मितीसाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान, लस निर्मिती करणारी कंपनी नोवाव्हॅक्सने दावा केली आहे की, त्यांची लस करोनाच्या व्हेरिअंट विरोधात ९० टक्क्यांहून अधिक प्रभावी आहे. कंपनीने अमेरिकेत मोठ्याप्रमाणावर संशोधन केल्यानंतर लस प्रभावी असल्याचे सांगितले आहे.

Good News: ऑक्सफर्ड पाठोपाठ नोव्हाव्हॅक्सने सिरमसोबत केला लस पुरवठ्याचा करार

अमेरिकन कंपनी नोवाव्हॅक्स मागील वर्षी ऑगस्टमध्ये पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाबरोबर एका करारावर स्वाक्षरी केली होती. ज्या अंतर्गत २०० कोटी लस निर्मिती केली जाणार होती.

जगभरात ८ लशींचा बोलबाला!; करोना विषाणू रोखण्यासाठी ठरताहेत प्रभावी

कंपनीने म्हटले की, लस करोनाविरोधात ९० टक्के प्रभावी ठरत असल्याचं दिसून आलं आहे व प्रारंभीच्या आकडेवारीनुसार ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचंही समोर आलं आहे. नोवाव्हॅक्सच्या लसीबाबत ही माहिती अशावेळी समोर आली आहे, जेव्हा जगभरात करोना विरोधातील लशीची प्रचंड मागणी सुरू आहे.

अमेरिकेत मोठ्याप्रमाणात लसीकरण होत असल्याने, तिथे लस तुटवडा जाणवत आहे. नोवाव्हॅक्स लशीला साठवण आणि वाहतूक करणे सोपे असल्याचेही सांगण्यात आले आहे. यामुळे विकसनशील देशांना लस पुरवठा करण्यात ही लस मोठं योगदान देण्याची शक्यता आहे. कंपनीने सांगितले की, सप्टेंबरच्या शेवटापर्यंत अमेरिका-युरोप व अन्य ठिकाणी लसीकरणासाठी या लशीला मंजुरी मिळवी या दिशेने प्रयत्न सुरू आहेत आणि तोपर्यंत एका महिन्यात दहा कोटी लस निर्मिती करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत.

देशात आतापर्यंत तीन लशींना मान्यता देण्यात आली आहे. यात कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक व्ही लसीचा समावेश आहे. दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राअध्यक्ष जो बायडेन यांनी जगभरात करोना विषाणूचा घातक परिणाम पाहता महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अमेरिका प्रशासन करोना लस दान करण्यासाठी फायझर बायो एन टेक लशीचे ५० कोटी डोस खरेदी करत आहे. अमेरिकन माध्यमांनी याचा खुलासा केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2021 7:15 pm

Web Title: novavax vaccine 90 percent effective against corona msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 वृद्ध मुस्लीम व्यक्तीवर हल्ला; जय श्रीराम बोलण्याची केली जबरदस्ती
2 अटकपूर्व जामीनासाठी आयशा सुल्ताना उच्च न्यायालयात; देशद्रोहाचा गुन्हा आहे दाखल
3 उत्तराखंडमध्ये चार धाम यात्रेला परवानगी, वाचा कोण जाऊ शकेल?
Just Now!
X