दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसच्या ६ आमदारांना फोडण्याचे प्रयत्न केल्याचा आरोप करणारे आम आदमी पक्षाचे माजी आमदार राजेश गर्ग यांनी आपल्याला दुसऱ्याच दिवशी धमकी देणारा फोन आल्याची तक्रार केली आहे. स्वत:ला ‘आप’चा चाहता असल्याचे सांगणाऱ्या दूरध्वनीकर्त्यांने आपल्याला हे प्रकरण आणखी न वाढवण्यास सांगितले.