News Flash

आता इलेक्ट्रॉनिक्सचे विश्व बदलणार

ही अवस्था बराच काळ गूढ असलेल्या संघननाधिष्ठित द्रव्य भौतिकशास्त्रातील काही गूढ बाबी उलगडणार आहेत.

कॅलिफोर्निया विद्यापीठात पदार्थाच्या वेगळ्या रचनेचा शोध

वैज्ञानिकांनी पदार्थाच्या वेगळ्या रचनेचा शोध लावला असून त्यात इलेक्ट्रॉन्सची मांडणी वेगळ्या क्रमाने असते, त्यामुळे नवीन इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची निर्मिती करता येऊ शकते.
ही अवस्था बराच काळ गूढ असलेल्या संघननाधिष्ठित द्रव्य भौतिकशास्त्रातील काही गूढ बाबी उलगडणार आहेत. अनेक धातूंमध्ये अतिवाहकता हा गुणधर्म उच्च तपमानालाही असतो, तो का असतो याचा उलगडा यात होणार आहे. प्रतिरोधाशिवाय वीज वाहून नेली जाते त्याला अतिवाहकता म्हणतात. काही पदार्थात शंभर अंश तपमानालाही ती असू शकते.
अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतील सहायक प्राध्यापक डेव्हीड सिए यांनी सांगितले, की हा शोध अनपेक्षित होता व त्यात आधीचा कुठलाही सिद्धांत नसतानाही द्रव्याची ही अवस्था सापडली आहे. यात इलेक्ट्रॉनिक्सच्या संपूर्ण जगात या शोधाने मोठे बदल होणार हे उघड आहे. कुठल्याही धातू किंवा पदार्थाचे स्थूल भौतिक गुणधर्म यातून उलगडतात. मल्टीपोलर ऑर्डर या तंत्राने या द्रव्यावस्थेचा शोध लागला आहे.
काही स्फटिक असे असतात, की ज्यांच्या अंतर्गत भागात इलेक्ट्रॉन काही विशिष्ट स्थितीत फिरतात व त्यात पुनरावर्ती पद्धतीने विद्युतभार साठत जातो व त्यामुळे एका विशिष्ट क्रमवारीत भारित इलेक्ट्रॉन दिसतात. यात विद्युतभाराशिवाय इलेक्ट्रॉन्सना स्वत:ची गिरकी असते. जेव्हा इलेक्ट्रॉन समांतर रेषेत गिरकी घेतात (उदा. स्फटिक) ते फेरोमॅग्नेट हा चुंबक प्रकार तयार करतात. फेरोमॅग्नेटचा वापर आपण प्रशीतक म्हणजे फ्रीजमध्ये वापरतो व त्याचाच वापर क्रेडिट कार्डच्या पट्टीवर केलेला असतो. गिरकीला परिमाण व दिशा असल्याने ते आकडय़ात सांगता येतात. जर विरोधी इलेक्ट्रॉन गिरकी घेत असतील, तर एक उत्तरेकडे एक दक्षिणेकडे असतो त्याला मॅग्नेटिक क्वाड्रापोल म्हणतात. विविध ध्रुवीय अवस्था या शोधणे अवघड असते.
सिए यांनी सांगितले, की जी नवी अवस्था शोधली आहे, त्यात बहुध्रुवीय अशी इलेक्ट्रॉन रचना असते व ती स्ट्राँटियम इरिडियम ऑक्साइड (एसआर२ एलआर ओ ४) हा घटक संश्लेषित संयुग असून त्याला इरिडेटस असे म्हणतात. बहुध्रुवीय इलेक्ट्रॉन रचना आणखी अनेक पदार्थाची असण्याची शक्यता असते. हे संशोधन ‘नेचर फिजिक्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेले असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2015 3:00 am

Web Title: now change the electronic world
Next Stories
1 चीनच्या धमक्या झुगारून अमेरिकी युद्धनौका सागरात
2 विद्यादेवी भंडारी नेपाळच्या अध्यक्षा
3 परदेशी नागरिकांना सरोगसीचा हक्क नाही!
Just Now!
X