12 December 2017

News Flash

आता विमानतळावर डेटिंग करा!

विमान सुटण्याची तासन्तास प्रतीक्षा करताना एकाकीपणामुळे कंटाळलेल्या जिवांना आता डेटिंगचा आधार मिळणार आहे. अमेरिकेतील

पीटीआय, वॉशिंग्टन | Updated: November 29, 2012 4:51 AM

विमान सुटण्याची तासन्तास प्रतीक्षा करताना एकाकीपणामुळे कंटाळलेल्या जिवांना आता डेटिंगचा आधार मिळणार आहे. अमेरिकेतील स्टीव्ह पॅस्टरनॅक या अवलियाने हा एकाकीपणा दूर करण्यासाठी एक विशेष वेबसाइट सुरू केली असून त्याद्वारे ज्यांच्याशी आपल्या आवडीनिवडी जुळू शकतात, अशा व्यक्तींसोबत विमानतळावर विरंगुळा साधता येणार आहे.  मियामी विमानतळावर एकदा एक विमान कमालीचे विलंबाने सुटल्याने स्टीव्हला अनेक तास एकाकीपणे घालवावे लागले होते. या क्षणी आपल्यासोबत समविचारी मैत्रीण असती तर आपला वेळ आनंदात गेला असता, अशी कल्पना त्याच्या मनात आली आणि त्याने या वेबसाइटचा घाट घातला. यातून या वेबसाइटचा जन्म झाला असून तिला प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. अल्पावधीतच या वेबसाइटची सदस्यसंख्या २० हजारांवर पोहोचली आहे.

First Published on November 29, 2012 4:51 am

Web Title: now do dating on airport
टॅग Airport,Dating