News Flash

आता ट्रेन तिकीट बुक करताना IRCTC ला द्यावी लागणार ‘ही’ माहिती

भारतीय रेल्वेने ट्रेन तिकीटांच्या ऑनलाइन बुकिंगमध्येही बदल केला आहे...

भारतीय रेल्वे प्रशासनाने ३० जूनपर्यंत रेल्वेच्या तिकिटांचे बुकींग करणाऱ्या प्रवाशांची तिकीटं रद्द करण्याची घोषणा केली आहे.  या तिकिटांचे पैसे प्रवाशांना परत करण्यात येत आहेत. या दरम्यान, रेल्वेकडून सोडण्यात आलेल्या विशेष रेल्वे आणि श्रमिक विशेष रेल्वे मात्र सुरू राहतील. गुरुवारी रेल्वेकडून ही माहिती देण्यात आली. यासोबतच आता भारतीय रेल्वेने ट्रेन तिकीटांच्या ऑनलाइन बुकिंगमध्येही बदल केला आहे.

लॉकडाउनदरम्यान जर तुम्ही विशेष ट्रेनने प्रवास करणार असाल तर आता तुम्हाला तिकीट बुक करताना अजून एक महत्त्वाची माहिती द्यावी लागणार आहे. आता रेल्वे प्रवाशांना ते ज्या ठिकाणी चाललेत तेथील पूर्ण पत्ता द्यावा लागणार आहे. जर भविष्यात गरज पडली तर सहजपणे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करता येणे शक्य व्हावे यासाठी ही माहिती आता आयआरसीटीसीला द्यावी लागणार आहे. कालपासून(दि.१३) आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर तिकीट बुक करतेवेळी ही नवीन माहिती विचारण्यास सुरूवात झालीये.

आणखी वाचा : (IRCTC च्या वेबसाइटवर अकाउंट कसं बनवायचं?)

दरम्यान, यापूर्वी बुधवारी रेल्वेने लॉकडाऊन विशेष रेल्वेसाठी २२ मे पासून वेटिंग तिकिटांची सुरुवात करण्याचीही घोषणा केली आहे. सध्या, केवळ कन्फर्म तिकिटांचंच बुकिंग सुरू आहे. परंतु, २२ मे पासून सुरु होणाऱ्या प्रवासासाठी १५ मेपासून सुरु होणाऱ्या तिकीट बुकिंगमध्ये वेटिंग लिस्टचाही समावेश असेल. एसीमध्ये २०, एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये २०, सेकंड एसीमध्ये ५०, थर्ड एसीमध्ये १००, एसी चेअर कारमध्ये १०० आणि स्लीपरमध्ये २०० पर्यंट वेटिंग तिकीटं दिले जातील.

आणखी वाचा : (मुंबईतून सुटणार ‘स्पेशल’ राजधानी, सर्व १५ ट्रेनचं ‘टाइमटेबल’ जाणून घ्या एकाच क्लिकवर)

 

 

 

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2020 1:01 pm

Web Title: now for booking online train tickets irctc wants your destination address as well sas 89
टॅग : Coronavirus
Next Stories
1 आईच्या मदतीने वडिलांनी माझ्यावर बलात्कार केला, पोटच्या मुलीचा आरोप
2 सीमेवर थांबवलेल्या वृद्धाचा ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू
3 सर्वसामान्य भारतीयांसाठी सैन्याने आखला ‘टूर ऑफ ड्युटी’ कार्यक्रम
Just Now!
X