पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’द्वारे संपूर्ण देशाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खेळणी उद्योगावर भाष्य करत. भारताला खेळणी उद्योगातील प्रमुख ठिकाण बनवण्यासाठी सर्वांनी एकत्र येत प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तसेच, आता सर्वांसाठी लोक खेळण्यांसाठी व्होकल होण्याची वेळ आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, करोनाच्या या संकट काळात देश अनेक आघाड्यांवर लढत आहे. मात्र, या दरम्यान अनेकदा एक प्रश्न मनात येत राहिला की, एवढ्या प्रदीर्घ कालावधीत घरात राहणाऱ्या माझ्या बाल मित्र-मैत्रिणींचा वेळ कसा जात असेल? यातूनच मी गांधीनगरच्या चिल्ड्रन युनिर्व्हसिटी जी जगातील एक आगळावेगळा प्रयोग आहे. भारत सरकारच्या अन्य मंत्रालयांबरोबर मिळून आपण मुलांसाठी काय करू शकतो यावर विचार केला. माझ्यासाठी हे अतिशय सुखद व लाभदायक होते. कारण, एकप्रकारे यातून काहीतरी नवं शिकण्याची मला संधी मिळाली. आमचा विषय होता, खेळण्या विशेषता भारतीय खेळणी..आम्ही यावर विचार केला की भारतामधील मुलांना नवनवीन खेळणी कशा मिळतील. भारत खेळणी निर्मितीमधील सर्वात मोठे ठिकाण कसे बनले. मित्रांनो खेळणी ज्या प्रकारे कार्यक्षमता वाढवणाऱ्या असतात, तशाच त्या आपल्या आकांक्षांना देखील भरारी देतात. खेळण्या केवळ मनच रमवत नाहीत, तर यामुळे मनही तयार होते आणि उद्देश देखील निर्माण होतो.

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांच्या एका विधानाचा दाखला देखील दिला. रविंद्रनाथ टागोर म्हणाले होते की, उत्कृष्ट खेळणी ती असते, जी अपूर्ण असते आणि मुलं खेळत खेळत तिला पूर्ण करतात. खेळणी अशी असावी जी मुलांच्या कार्यक्षमतेला प्रोत्साहन देतील. मुलांच्या जीवनातील विविध पैलुंवर खेळण्यांचा जो प्रभाव आहे. यावर राष्ट्रीय शिक्षा धोरणातही अतिशय लक्ष देण्यात आले आहे. खेळता खेळता शिकणे, खेळणी बनवणे शिकणे, ज्या ठिकाणी खेळणी तयार केली जाते, त्या ठिकाणी भेट देणे. या सर्वांना अभ्यासक्रमाचा भाग बनवण्यात आले. आपल्या देशात स्थानिक खेळण्यांची मोठी समृद्ध परंपरा आहे. अनेक प्रतिभाशाली आणि कुशल कारागीर आहेत. जे चांगली खेळणी बनवण्यात अतिशय कुशल आहेत. भारताममधील काही भाग खेळणी निर्मितीचे केंद्र म्हणून विकसीत होत आहेत. जसे कर्नाटकमधील रामनगरम येथे चन्नापटना, आंध्र प्रदेशच्या कृष्णामध्ये कोंडापल्ली, तामिळनाडूतील तंजौर, आसामधील धुबरी व उत्तर प्रदेशमधील वाराणसी अशी अनेक ठिकाणं असल्याचे मोदींनी सांगितले.

मोदी म्हणाले, वैश्विक खेळणी उद्योग सात लाख कोटींपेक्षाही जास्तचा आहे. परंतु भारताचा हिस्सा त्यामध्ये कमी आहे. तुम्ही सर्वजण विचार करा की ज्या देशाकडे एवढी परंपरा आहे, विविधता आहे, युवा शक्ती आहे. असे असताना खेळण्यांच्या बाजारपेठेत त्या देशाचा वाटा इतका कमी असणं, आपल्याला चांगलं वाटेल का? अजिबात नाही. हे ऐकल्यानंतर नक्कीच तुम्हालाही चांगलं वाटणार नाही. खेळण्यांचा उद्योग अतिशय व्यापक आहे. गृहउद्योग असेल, छोटे व लघु उद्योग असतील, मोठे व खासगी उद्योग असतील याच्याच क्षेत्रात येतात. या सर्वांना पुढे नेण्यासाठी देशाला एकत्रितपणे कष्ट करावे लागणार आहे. या सर्वजण मिळून खेळणी तयार करूयात. आता सर्वांसाठी लोकल खेळण्यांसाठी व्होकल होण्याची वेळ आहे.