News Flash

आता गुगलवरून ‘रायगड’ दर्शन

कधी वाढती महागाई तर कधी वाढती थंडी.. कधी वयोपरत्वे येणाऱ्या मर्यादा तर कधी परीक्षा.. दरवेळी निमित्त वेगळे, पण देशातील रम्य अशा ऐतिहासिक वास्तूंच्या सफरीचे स्वप्न

| February 21, 2014 03:03 am

कधी वाढती महागाई तर कधी वाढती थंडी.. कधी वयोपरत्वे येणाऱ्या मर्यादा तर कधी परीक्षा.. दरवेळी निमित्त वेगळे, पण देशातील रम्य अशा ऐतिहासिक वास्तूंच्या सफरीचे स्वप्न सत्यात उतरत नाही. पण आता गुगल आणि भारतीय पुरातत्त्व विभाग यांनी घरबसल्या अशा सफरी घडविण्याची सोय करून दिली आहे. ताजमहाल असो वा समुद्रसपाटीपासून सुमारे साडेचार हजार फूट उंचीवर असलेला रायगड, त्याचे ३६० अंशांमधून दर्शन घेणे आपल्याला शक्य होणार आहे.
भारतात सध्या राष्ट्रीयदृष्टय़ा महत्त्वाची अशा १०० स्मारकांपैकी ३० स्मारकांची ३६० अंशांमधून घेण्यात आलेली छायाचित्रे आता गुगलवर उपलब्ध करून दिली जाणार आहेत. ‘स्ट्रीट व्ह्य़ू ट्रेकर’ तंत्रज्ञानाचा वापर करीत उपलब्ध करून देण्यात आलेल्या या सुविधेमुळे सुमारे २० कोटी भारतीयांना तसेच जगभरातील एकतृतीयांश जनतेला संकेतस्थळाद्वारे या वास्तू बसल्या जागी संकेतस्थळावर पाहणे शक्य होणार आहे.सरकारकडे याबाबत प्रस्ताव आल्यानंतर गेल्या पाच महिन्यांत सरकारने ३० स्मारकांचे काम पूर्ण केले असून उर्वरित ७० स्मारकांचीही ऑनलाइन सफर घडविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
या वास्तूही दिसणार.
ताजमहाल, लाल महाल, हुमायूनची कबर, जंतरमंतर वेधशाळा, कुतुबमिनार, आग्रा किल्ला, फतेहपूर सिक्री, आगाखान पॅलेस, बिबी का मकबरा, फोर्ट सेंट जॉर्ज, नागर्जुन टेकडय़ा, रायगड
फायदा कुणाला?
या सुविधेमुळे सुदूर क्षेत्रांमध्ये असलेल्या गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना, वारसा आणि सांस्कृतिक संपन्नता यांचा प्रसार करू पाहणारे अभ्यासक, इंटरनेटच्या माध्यमातून अभ्यास करणारे विद्यार्थी, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घराबाहेर पडू न शकणारे ज्येष्ठ नागरिक आणि आर्थिकदृष्टय़ा संपन्न नसलेल्या कुटुंबातील व्यक्ती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2014 3:03 am

Web Title: now raigad tour on google
टॅग : Google
Next Stories
1 पत्नीला दरमहा ४० हजार रुपये द्या!
2 ७२०० किलोमीटर रस्त्यांचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर
3 राजीव मारेकऱ्यांच्या सुटकेला स्थगिती
Just Now!
X