यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये उभे राहणाऱ्या उमेदवारांना आता इंटरनेटच्या महाजालात सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांवरील प्रसिद्धीसाठी केलेल्या खर्चाचीही माहिती जाहीर करावी लागणार आहे.
भारतीय निवडणूक आयोगाने प्रसिद्धीच्या साधनांमध्ये वृत्तपत्रे, टेलिव्हिजन यांसह सोशल मीडिया आणि संकेतस्थळांचाही समावेश केला असल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.
सोशल नेटवर्किंग साइट्स, ब्लॉग आणि इतर संकेतस्थळांवरील कोणत्याही उपक्रमांचा समावेश त्या उमेदवाराच्या निवडणूक खर्चामध्ये करण्यात येईल, असे निवडणूक आयोगाचे महासंचालक आशुतोष राऊत यांनी सांगितले. हा समावेश पहिल्यांदा करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.