News Flash

मोदी हे तर फेक देसी ओबामा – दिग्विजयसिंह

कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी पुन्हा एकदा आपल्या धारदार ट्विटने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना घायाळ केले.

| August 12, 2013 03:38 am

कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी पुन्हा एकदा आपल्या धारदार ट्विटने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना घायाळ केले. मोदी यांचे नाव न घेता केलेल्या ट्विटमध्ये दिग्विजयसिंह यांनी त्यांच्यावर अगदी मोजक्या शब्दांत हल्ला चढविला. ‘आता आपल्याकडे एक फेक देसी ओबामादेखील आहेत. फेकू याची सर्वोत्तम फेक’ या शब्दांत दिग्विजयसिंह यांनी मोदींवर निशाणा साधला.
हैदराबादमध्ये रविवारी घेतलेल्या सभेमध्ये मोदी यांनी केंद्रातील सत्ताधारी कॉंग्रेसवर घणाघाती टीका केली होती. एकगठ्ठा मतांसाठी चटावलेल्या कॉंग्रेसला देशाच्या संरक्षणाची कोणतीही पर्वा नसून, कॉंग्रेसच्या हाती देश सुरक्षित आहे, हा विश्वासच लोकांच्या मनातून पुरता ओसरला आहे, अशी टीका मोदी यांनी केली होती. सभेच्या शेवटी मोदी यांनी ‘येस वुई कॅन…’ आणि ‘वुई विल डू…’ अशी घोषणा सभेला उपस्थित असलेल्यांकडून वदवून घेतली. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी तिथे झालेल्या निवडणुकीत ‘येस वुई कॅन…’ हीच आपल्या प्रचाराचा मुख्य घोषणा केली होती. तिच मोदी यांनी हैदराबादच्या सभेमध्ये लोकांकडून म्हणवून घेतली. त्यावरून दिग्विजयसिंह यांनी मोदींवर हल्ला केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2013 3:38 am

Web Title: now we have a fake desi obama too digvijaya singh criticized narendra modi
टॅग : Digvijaya Singh
Next Stories
1 किश्तवार हिंसाचार: अब्दुल्लांचा गुजरातवर निशाणा; सज्जाद किचलूंचा राजीनामा
2 सर्वोच्च न्यायालयाचा अमित शाह यांना दिलासा
3 पाकिस्तानच्या गोळीबारात सुरक्षा दलाचा जवान जखमी
Just Now!
X