News Flash

Coronavirus – …आता आपल्याला अधिक सक्रिय होण्याची आवश्यकता – मोदी

करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी साधला ऑनलाइन संवाद

(संग्रहित छायाचित्र)

करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज(बुधवार) पंतप्रधान मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी ऑनलाइन संवाद साधला. यावेळी मोदी म्हणाले, “आपल्याला भीतीचे वातावरण नाही निर्माण करायचं. मात्र काही दक्षता बाळगून काही बाबतीत पुढाकार घेऊन, आपल्याला जनेतला संकटातून बाहेर देखील काढायचं आहे. आपल्या जुन्या प्रयत्नांचा समाविष्ट करून आपल्याला नवे धोरण आखावे लागणार आहे. प्रत्येक राज्याचे विविध प्रयोग आहेत व चांगले प्रयोग आहेत. अनेक राज्य अन्य राज्यांकडून नवनवीन प्रयोग शिकत आहेत. आता आपल्याला सक्रिय होण्याची आवश्यकता आहे. करोनाची दुसरी लाट तत्काळ रोखायला हवी.”

आणखी वाचा- महाराष्ट्र सरकारने ५६% लसी वापरल्याच नसल्याचा जावडेकरांचा आरोप; म्हणाले, “आधी नियोजनाचा अभाव आणि आता…”

तसेच, “जिथं आवश्यक आहे आणि हे मी ह आग्रहाने सांगतो की मायक्रो कंटेंनमेंट झोन बनवण्याच्या पर्यायत कोणत्याही परिस्थितीत हयगय होता कामा नये. यावर काम झालं पाहिजे. याशिवाय करोना लस वाया जाण्याचे प्रकार थांबवावे.” असं देखील यावेळी मोदींनी सांगितलं.

“संसर्ग झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांना कमीत कमी वेळात शोधून काढणं आणि आरटीपीसीआर टेस्ट ७० टक्क्यांपेक्षा अधिक ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. देशातील सर्व राज्यांमध्ये आरटीपीसीआर टेस्ट वाढवण्यावर भर देण्याची आवश्यकता आहे.” असंही मोदी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2021 2:29 pm

Web Title: now we need to be more proactive modi msr 87
Next Stories
1 महाराष्ट्र सरकारने ५६% लसी वापरल्याच नसल्याचा जावडेकरांचा आरोप; म्हणाले, “आधी नियोजनाचा अभाव आणि आता…”
2 “पहाटेच्या अजानमुळे माझी झोपमोड होते”; अलाहाबाद विद्यापिठाच्या कुलगुरूंचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
3 नीता अंबानी खरंच मानद प्राध्यापक होणार आहेत का?; रिलायन्सकडून वृत्तावर खुलासा
Just Now!
X