News Flash

आधारमधील बदल घरीच करता येणार, सरकारने सुरु केलं mAadhaar App; जाणून घ्या फिचर्स

UIDAI ने mAadhaar App चे नवीन अपडेट सादर केले आहे. ज्यामधून आपण बर्‍याच गोष्टींचा लाभ घेऊ शकता.

आधारमधील बदल घरीच करता येणार, सरकारने सुरु केलं mAadhaar App

आजच्या काळात भारतात आधार कार्ड अनिवार्य झाले आहे. सरकारी काम असो की खासगी आधार आवश्यक आहे. सिमकार्ड जरी खरेदी करायचे असेल किंवा बँकेत खाते उघडायचे असेल, या सर्व कामांसाठी आधार आवश्यक आहे. अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील आधार आवश्यक आहे. ओळख पटविण्यासाठी आधार कार्डचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. मात्र, हे आधार कार्ड आपण विसरलो कींवा कार्डमध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी असल्यास त्या कारणामुळे आपले महत्त्वपूर्ण काम अडकले जाऊ शकते. आपल्यालाही अशाच प्रकारची समस्या येत असेल आणि आधार कार्यालयात जाण्याचा कंटाळा आला असेल. तर आता तुम्ही घरी बसून आपल्या समस्या सोडवू शकता. यासाठी आपल्या मोबाईल मध्ये mAadhaar App डाऊनलोड करा किंवा आधीच असेल तर अपडेट करा.

अलीकडेच UIDAI ने mAadhaar App चे नवीन अपडेट सादर केले आहे. ज्यामधून आपण बर्‍याच गोष्टींचा लाभ घेऊ शकता. हे अ‍ॅप डाऊनलोड करतांना बनावट अ‍ॅप पासून सावधान राहणे आवश्यक आहे. तसेच हे अ‍ॅप UIDAI ने जारी केलेल्या अधिकृत लिंकवरूनचं डाऊनलोड करा.

करोना लस प्रमाणपत्रातील चुका कशा सुधाराल, जाणून घ्या…

जाणून घ्या mAadhaar App चे फायदे 

  • mAadhaar अ‍ॅपद्वारे आपण आपल्या फोनवर आधारची कॉपी डाऊनलोड करु शकता
  • mAadhaar अ‍ॅपमध्ये Aadhaar री-प्रिंटचे ऑप्शन देखील आहे.
  • या अ‍ॅपद्वारे, आवश्यक असल्यास आपण ऑफलाइन मोडमध्ये आधार दाखवू शकता. एक प्रकारे ते ओळखपत्र म्हणून काम करेल. म्हणून आपल्यास आपल्या आधारची कोणतीही प्रत संपूर्ण वेळ सोबत ठेवण्याची आवश्यकता नाही.
  • या अ‍ॅपमध्ये कोणत्याही कागदपत्रांशिवाय पत्ता देखील अपडेट करता येईल.
  • कुटुंबाचील ५ व्यक्तिंचे आधार या अ‍ॅपमध्ये ठेवू शकतो.
  • या अ‍ॅपद्वारे आधार कार्ड धारक कधीही त्यांचा UID किंवा आधार क्रमांक लॉक किंवा अनलॉक करू शकतात.
  • सुरक्षा लक्षात घेऊन हे फीचर या अ‍ॅपमध्ये देण्यात आले आहेत. कारण बायोमेट्रिक डेटा आधारशी जोडला गेला आहे, जो फार महत्वाचा आहे. या अ‍ॅपमध्ये देण्यात आलेल्या बायोमेट्रिक लॉकिंग सिस्टमचा वापर करून, आधार लॉक होईल आणि आपण तो अनलॉक करेपर्यंत त्याचा वापर करता येणार नाही.
  • या अ‍ॅपद्वारे क्यूआर कोड आणि ईकेवायसी डेटा शेअर केला जाऊ शकतो.
  • या अ‍ॅपद्वारे तुम्हाला जवळच्या आधार नोंदणी केंद्राची माहिती देखील सहज मिळू शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 3:57 pm

Web Title: now you will get aadhar card download reprint and other facilities at home srk 94
Next Stories
1 लसीसाठी Cowin वर स्लॉट बुक करताना या चुका केल्या तर कायमचे व्हाल बॅन
2 जाणून घ्या : दि. बा. पाटील कोण होते? नवी मुंबई विमानतळाला त्यांचं नाव देण्याची मागणी का केली जातेय?
3 जाणून घ्या: शेतकरी आंदोलनाचं मूळ असलेलं MSP म्हणजे काय?
Just Now!
X