21 March 2019

News Flash

प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅज्युईटी संदर्भात Good News

करमुक्त ग्रॅज्युईटीची मर्यादा १० लाख रुपये होती.

प्रातिनिधिक छायाचित्र

तुम्ही खासगी क्षेत्रात नोकरी करता का ? मग तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला मिळणारी २० लाख रुपयापर्यंत ग्रॅज्युईटी करमुक्त असेल. याआधी करमुक्त ग्रॅज्युईटीची मर्यादा १० लाख रुपये होती. आज संसदेमध्ये करमुक्त ग्रॅज्युईटीची मर्यादा वाढवणारे विधेयक दुरुस्तीसह मंजूर झाले.

राज्यसभेत आज हे महत्वपूर्ण विधेयक मंजूर झाले. मागच्या आठवडयात लोकसभेमध्ये हे विधेयक मंजूर करण्यात आले होते. सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर केंद्र सरकारच्या सेवेत असणाऱ्या  कर्मचाऱ्यांची २० लाख रुपयांपर्यंत ग्रॅज्युईटी करमुक्त झाली होती. खासगी क्षेत्रालाही ही सुविधा लागू करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील होते.

काय आहे ग्रॅज्युईटी 

ग्रॅज्युईटी पगाराचाच एक भाग आहे. कर्मचाऱ्याने एखाद्या कंपनीत पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर मालकाकडून कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युईटी दिली जाते. ग्रॅज्युईटीची ही रक्कम निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी दिली जाते. इन्कम टॅक्स कायद्यातंर्गत ग्रॅज्युईटीच्या रक्कमेवर कर आकारला जात नाही.

खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कसा होणार फायदा

ग्रॅज्युईटी संदर्भात आवश्यक दुरुस्तीसह विधेयक मंजुर झाले आहे. मध्यम आणि व्यवस्थापनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना याचा फायदा होईल. उच्च वेतनधारकांना याचा जास्त फायदा आहे.

First Published on March 22, 2018 5:53 pm

Web Title: nowtax free gratuity limit doubled to rs 20 lakh
टॅग Tax Free