News Flash

“मुस्लिमांना बेदखल करण्यासाठी भारताने केला ‘एनआरसी’च्या हत्याराचा वापर”

अमेरिकी धार्मिक स्वातंत्र्य आयोगाची टीका

एनआरसीच्या यादीत कायदेशीर भारतीय नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे.

अमेरिकी धार्मिक स्वातंत्र्य आयोगाची टीका

भारतातील आसाम राज्यात जी नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) करण्यात आली तो धार्मिक अल्पसंख्याकांना लक्ष्य बनवण्याचाच भाग होता किंवा मुस्लिमांना देशहीन करण्यासाठी एनआरसीचे हत्यार वापरण्यात आले, अशी टीका अमेरिकेच्या धार्मिक स्वातंत्र्यविषयक आयोगाने केली आहे.

एनआरसीच्या यादीत कायदेशीर भारतीय नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे. ही योजना आसाममधील घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी राबवण्यात आली. त्यात १९ लाख निवासी व्यक्तींना बेदखल करून यादीत समाविष्ट केले गेले नाही कारण त्यांच्याकडे कागदपत्रे नव्हती. या सगळ्या घटनाक्रमावर अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाने म्हटले आहे, की अनेक देशी व आंतरराष्ट्रीय संस्थांनी आसाममधील एनआरसीवर चिंता व्यक्त केली आहे. आसाममधील बंगाली मुस्लिमांचे अधिकार काढून घेण्याचा डाव यात आहे. त्यातून अनेक मुस्लीम देशहीन होणार आहेत, त्यांना कुठेच स्थान असणार नाही. भारतीय नागरिकत्व नोंदणीत ज्यांना नागरिकत्व सिद्ध करता आले त्यांचीच नावे आहेत. ही प्रक्रिया २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून सुरू करण्यात आली होती. त्यात आसाममधील ३३ दशलक्ष नागरिकांना ते २४ मार्च १९७१ पूर्वीपासून भारताचे नागरिक असल्याचे सिद्ध करावे लागणार होते.

युएससीआयआरएफ या संस्थेने ‘इश्यू ब्रीफ- इंडिया’ या अहवालात म्हटले आहे, की आसाममध्ये एनआरसीचा वापर धार्मिक अल्पसंख्याकांना बेदखल करण्यासाठी सरकारने केला. त्यात भारतीय मुस्लीम देशहीन होणार आहेत. त्यामुळे भारतात धार्मिक स्वातंत्र्याची पायमल्ली झाली आहे. धोरण विश्लेषणक हॅरीसन अकिन्स यांनी लिहिलेल्या या अहवालात असा आरोप करण्यात आला की, ऑगस्ट २०१९ मध्ये एनआरसी जाहीर झाल्यापासून भाजपा सरकारने मुस्लीमविरोधी भूमिका अधिक प्रखर केली. भारतीय नागरिकांची धार्मिक चाचणीच भाजपाने केली. हिंदू व निवडक काही धर्माच्या लोकांचे नागरिकत्व योग्य ठरवून मुस्लिमांना बेदखल करण्याचा डाव यात होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2019 6:35 pm

Web Title: nrc is a tool to render indian muslims stateless says us federal panel on religious freedom mppg 94
Next Stories
1 जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर हल्ला; एक जवान शहीद, दोन जखमी
2 “अमित शाह म्हणाले, काळजी करू नका; भाजपा-सेनाच सरकार स्थापन करेल”
3 अयोध्या निकाल : मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड न्यायालयाच्या निर्णयाला देणार आव्हान
Just Now!
X