पत्नीच्या हत्येप्रकरणी अनिवासी भारतीयाला २८ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. लंडन येथील न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. हरप्रीत औलख या अमरेकितेल अनिवासी भारतीयाने ९ वर्षांपूर्वी त्याच्या पत्नीची म्हणजेच गीता औलखची हत्या केली होती. याच गुन्ह्यासाठी ९ वर्षांनी त्याला २८ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. यासाठी हरप्रीत औलखला मंगळवारी अमृतसरमध्ये आणण्यात येणार आहे.

पहिल्यांदाच अशा प्रकारे एखाद्या अनिवासी भारतीयाला भारतात आणण्यात येते आहे. पंजाब येथील अमृतसर तुरुंग विभागाचे तीन अधिकारी त्याला इथे घेऊन येणार आहेत. लंडनमधून ते हरप्रीतचा ताबा घेतील आणि त्याला इथे आणून त्याची रवानगी अमृतसर येथील तुरुंगात करतील अशीही माहिती समोर येते आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे. लंडनमधून हरप्रीतला दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरारष्ट्रीय विमानतळावर आणले जाईल त्यानंतर त्याची रवानगी तुरुंगात करण्यात येणार आहे.

काय आहे प्रकरण?

गीता आणि हरप्रीत यांच्या लग्नाला २००९ मध्ये दहा वर्षे पूर्ण झाली होती. त्यांना दोन मुलेही आहेत. या मुलांचे वय २००९ मध्ये ८ वर्षे आणि १० वर्षे होते. तर गीता ही सनराइज रेडिओतच्या एशियन रेडिओवर रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. लंडन येथील ग्रीनफोर्ड भागात या यांचे ऑफिस होते. हरप्रीतने त्याच्या पत्नीला म्हणजेच गीताला मारण्यासाठी सुपारी किलर्स बोलावले होते. जसवंत सिंग आणि शेर सिंग अशी या दोघांची नावे होती. गीतावर या दोघांनी हल्ला केला. या हल्ल्यात तिला गंभीर जखमा झाल्या.

हा हल्ला इतका भयंकर होता की गीताच्या डोक्याला त्यामुळे गंभीर दुखापत झाली. तसेच यावेळी झालेल्या झटापटीत त्यांचा गीताचा हातही मोडला. गीताचे दुसऱ्या पुरुषासोबत संबंध आहेत असा संशय हरप्रीतला होता. तिचे फेसबुक अकाऊंट हॅक झाले होते त्यामुळे त्याने तिच्यावर आरोप केले. मात्र याच संशयाने शेवटपर्यंत त्याचा पिच्छा सोडला नाही आणि या संशयातूनच हरप्रीतने त्याच्या पत्नीला अर्थात गीताला संपवले. तिची हत्या करण्याची सुपारी हरप्रीतनेच दिली होती हेदेखील तपासात समोर आले आता त्याला २८ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.