05 April 2020

News Flash

‘त्याने अचानक पँटची चेन काढली आणि हस्तमैथुन करु लागला’

सीआयएसएफने प्रवाशाला दिल्ली पोलिसांच्या हवाली केलं असून पोलिसांनी प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

विमानात महिला प्रवाशामसोर हस्तमैथुन करणाऱ्या एनआरआय प्रवाशाला दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली आहे. रशियाचा नागरिक असलेला ५८ वर्षीय प्रवासी प्रवासादरम्यान हस्तमैथुन करत होता अशी तक्रार महिलेने केली आहे. हा प्रवासी महिलेच्या शेजारी बसला आहे. इस्तंबूल – दिल्ली विमान प्रवासादरम्यान हा प्रकार घडला असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला तुर्कीश एअरलाइन्सच्या विमानात असभ्य प्रवासी प्रवास करत असल्याची सूचना देण्यात आली होती. विमानाने (TK-716) लँडिंग करताच सीआयएसएफचे जवान विमानाजवळ पोहोचले. यावेळी त्यांना महिलेसोबत घडलेल्या प्रकाराची माहिती देण्यात आली. दिल्ली पोलिसांनाही सह-प्रवाशाकडून महिलेला असभ्य वागणूक देण्यात आल्याची तक्रार करण्यात आली.

“महिला प्रवाशाने दिलेल्या तक्रारीनुसार, रशियन पासपोर्ट असलेला प्रवाशी शेजारच्या सीटवर बसला होता. त्याने अचानक आपल्या पँटची चेन काढली आणि आपल्यासमोर हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली”, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. महिला प्रवाशाने केबिन क्रूला केलेल्या तक्रारीनंतर प्रवाशाला दुसऱ्या जागी बसवण्यात आलं.

सीआयएसएफने प्रवाशाला दिल्ली पोलिसांच्या हवाली केलं आहे. पोलिसांनी प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2018 12:07 pm

Web Title: nri passenger arrested for masturbating in front of woman
Next Stories
1 जे सरकार कुत्र्यांची दहशत थांबवू शकत नाही ते गुंडांची दहशत काय थांबवणार? : अखिलेश यादव
2 पगार मागितला म्हणून १६ वर्षाच्या मुलीची हत्या, मृतदेहाचे तुकडे फेकले नाल्यात
3 काँग्रेसच्या ‘या’ चुकीमुळेच कर्नाटकात भाजपाला १०४ जागा: मायावती
Just Now!
X