सुरतजवळील काकरापार अणुऊर्जा केंद्रातील एक युनिट जड पाण्याच्या गळतीमुळे बंद करावे लागल्याच्या घटनेचा तज्ज्ञांच्या पथकाने तपास सुरू केला आहे. तपासामध्ये या गळतीचे कारण शोधले जाणार आहे. दरम्यान, या केंद्राच्या परिसरात किरणोत्सर्जन झाले नसल्याचा अधिकाऱ्यांनी पुनरुच्चार केला आहे.

अणुऊर्जा केंद्राच्या अधिकाऱ्यांना तपासात मदत करण्यासाठी अणुऊर्जा नियामक मंडळाचे दोन सदस्य घटनास्थळी पोहोचले आहेत. गळती झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीही बंद असलेल्या बाधित केंद्रातील परिस्थितीचा आढावा घेण्याची जबाबदारी या तज्ज्ञांवर आहे.