News Flash

गोव्यात न्यूड पार्टीचे पोस्टर्स; पोलिसांनी सुरू केला तपास

न्यूड पार्टीसाठी गोव्यातील तीन संभाव्य ठिकाणांचा उल्लेख करण्यात आला आहे.

गोवा आणि पार्टी हे समीकरण हे काही नवं नाही. गोव्यात अनेकदा अनेक ठिकाणी पार्ट्यांचं आयोजन करण्यात येत असतं. परंतु गोव्यात आयोजित होणाऱ्या एका पार्टीने पोलिसांचीही झोप उडवली आहे. रिपोर्ट्सनुसार येत्या सोमवारी गोव्यात न्यूड पार्टीचं आयोजन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. न्यूड पार्टीसंदर्भात काही पोस्टर्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यानंतर गोवा पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आहे. “पोलिसांनी या पोस्टर्सवरून तपासाचे आदेश दिले आहेत. तसंच पोस्टरमध्ये करण्यात आलेल्या दाव्यांनुसार ही नागा उत्तर गोव्यातील आहे,” अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

न्यूड पार्टीसाठी उत्तर गोव्यातील तीन संभाव्य ठिकाणांचा उल्लेख पोस्टरमध्ये करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलं. परंतु या पार्टीबाबात अन्य कोणतीही माहिती तसंच त्याची तारीखही जाहीर करण्यात आलेली नाही. या पार्टीमध्ये 10 ते 15 परदेशी तरूणी आणि काही भारतीय तरूणीही सहभागी होणार असल्याही पोस्टरमध्ये नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत गोव्यात अशाप्रकारची पार्टी होऊ देणार नसल्याचे गोवा पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि पर्यटन मंत्री प्रमोद आजगावकर यांनी या प्रकरणी त्वरित हस्तक्षेप करून अशा पार्ट्यांवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी गोवा महिला काँग्रेसच्या प्रमुख प्रतिमा कोटिन्हो यांनी केली. यापूर्वीही गोव्यात अशा अनेक पार्ट्यांचे आयोजन केले होते, ज्यामध्ये पोलिसांनी छापे टाकत कारवाई केली होती. परंतु आता न्यूड पार्टीचे पोस्टर्स समोर आल्यानं अशा पार्ट्यांचं आयोजन कोणाकडून करण्यात येत आहे हे तपासण्याचा प्रश्न पोलिसांसमोर उभा ठाकला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2019 12:15 pm

Web Title: nude party organized in north goa posters viral on social media police investigating jud 87
Next Stories
1 पोलिसांना चौकशीदरम्यान स्थावर मालमत्ता जप्तीचा अधिकार नाही – सुप्रीम कोर्ट
2 सोने, चांदी नाही तर आठ लाखांचा कांदा चोरीला, व्यापाऱ्याची पोलिसांत तक्रार
3 ‘पीएमसी’ बँकेवर ‘आरबीआय’चे निर्बंध, केवळ एक हजार रुपयेच काढता येणार
Just Now!
X