News Flash

देशभरातील करोनाबाधितांची संख्या ३३७४

एकूण ७९ जणांचा मृत्यू; २६७ जण पूर्णत: बरे

संग्रहित छायाचित्र

देशात आणखी ४७२ जणांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून आणखी ११ जणांचा मृत्यू झाल्याने देशातील करोनाबाधितांची संख्या ३३७४ वर पोहोचली आहे तर एकूण ७९ जणांचा मृत्यू झाला आहे, असे आरोग्य मंत्रालयातर्फे रविवारी सांगण्यात आले.

तथापि, विविध राज्यांमधील वृत्तानुसार देशात आतापर्यंत करोनामुळे १०६ जणांचा मृत्यू झाला असून बाधितांची संख्या ३६२४ वर पोहोचली आहे. त्यापैकी २८४ जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.

शनिवारपासून देशात आणखी ४७२ जणांना करोनाची लागण झाली असून ११ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या ३३७४ वर पोहोचली असून एकूण ७९ जणांचा मृत्यू झाला आहे तर २६७ जण पूर्ण बरे झाले आहेत, असे आरोग्य मंत्रालयातील सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले.

महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे २४ जणांचा मृत्यू झाला असून त्यापाठोपाठ गुजरात (१०), तेलंगण (सात), मध्य प्रदेश व दिल्ली (प्रत्येकी सहा) आणि पंजाब (पाच) जणांचा मृत्यू झाला आहे.

एअर डेक्कनची उड्डाणे स्थगित

नवी दिल्ली : करोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशात २१ दिवसांची संचारबंदी जारी करण्यात आल्याने नागरी उड्डाण क्षेत्रातील महसुलात घट झाली आहे त्या पार्श्वभूमीवर एअर डेक्कनने पुढील आदेशापर्यंत विमानांची उड्डाणे स्थगित केली असून सर्व कर्मचाऱ्यांना त्वरित विनावेतन सुट्टीवर पाठविले आहे.एअर डेक्कनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुणकुमार सिंह यांनी या बाबत कर्मचाऱ्यांना ई-मेल पाठविले आहेत. सध्याची जागतिक आणि देशातील स्थिती पाहता आणि भारतीय नियामकाने १४ एप्रिलपर्यंत विमानांची उड्डाणे स्थगित करण्याचे आदेश दिले असल्याने एअर डेक्कनसमोर उड्डाणे स्थगित करण्याशिवाय अन्य पर्याय नाही, असे सिंह यांनी ई-मेलमध्ये म्हटले आहे. त्याचप्रमाणे एअर डेक्कनमधील सर्व कर्मचाऱ्यांना (कायमस्वरूपी, हंगामी आणि कंत्राटी) विनावेतन सुट्टीवर पाठवावे लागत असल्याचे आपण जड अंत:करणाने जाहीर करीत आहोत, असेही सिंह यांनी संदेशात म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2020 12:14 am

Web Title: number of corona patient in the country 3374 abn 97
Next Stories
1 ओमर यांच्याकडून उद्धव ठाकरे यांचे कौतुक
2 चीनकडून १००० व्हेन्टिलेटर
3 अलगीकरण केंद्रावरून चकमकीत एक ठार
Just Now!
X