01 March 2021

News Flash

भारताचा रिकव्हरी रेट जगात सर्वाधिक; एक कोटीपेक्षा अधिक रूग्ण करोनामुक्त

पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये दररोज ३ टक्क्यांनी होतेय घट

संग्रहित (PTI)

कोविड-१९ आजारातून बरे होणाऱ्या भारतातील रुग्णांचं प्रमाण जगात सर्वाधिक असून भारताचा रिकव्हरी रेट ९६.३६ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्याचबरोबर या बरे होणाऱ्या रुग्णांनी १ कोटीचा टप्पाही पार केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ही माहिती दिली.

ताज्या डेटा नुसार, “गेल्या २४ तासांत भारतात १९,५८७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचबरोबर १,००,१६,८५९ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे भारताचा राष्ट्रीय रिकव्हरी रेट ९६.३६ टक्के झाला आहे. जो जगात सर्वाधिक आहे. सध्याच्या अॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ४४ पटींनी जास्त आहे. सध्या देशात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण २,३८,०८३ इतके असून जे २.१९ टक्के इतकं आहे.

भारतात करोनाच्या संसर्गाच्या प्रमाणात दररोज सातत्याने घट होत असून दररोज साधारण ३ टक्क्यांनी पॉझिटिव्हिटी रेट कमी होत आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांतून एकूण ५१ टक्के बरे झालेल्या रुग्णांचं प्रमाण आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2021 2:54 pm

Web Title: number of covid 19 recoveries surpass 1 crore indias national recovery rate highest in world aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 हिंसाचारामुळे एकाचवेळी व्हाइट हाऊसमधील तीन महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींनी दिले राजीनामे
2 अध्यक्ष पदाची मुदत संपण्याआधीच ट्रम्प यांची गच्छंती?; हिंसाचार प्रकरणात ऐतिहासिक निर्णयाची शक्यता
3 पाच राष्ट्रीय नेत्यांना मोदींनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; ममता बॅनर्जींना विसरले!
Just Now!
X