X
X

राज्यसभेत विरोधकांचे संख्याबळ घटणार

READ IN APP

वर्षभरात ६८ जागांसाठी निवडणूक

राज्यसभेतील ६८  जागा यावर्षी रिक्त होणार आहेत. यात काँग्रेस आणखी काही जागा गमावणार असल्याने सभागृहातील विरोधकांचे संख्याबळ आणखी कमी होणार आहे.

रिकाम्या होणाऱ्या १९ पैकी सुमारे ९ जागा काँग्रेस गमावू शकते. प्रियंका गांधी वढेरा, ज्योतिरादित्य शिंदे आणि रणदीप सुरजेवाला यांच्यासह काही बडय़ा नेत्यांना वरिष्ठ सभागृहात आणण्याचा काँग्रेस विचार करत असल्याची चर्चा आहे.

स्वबळावर ९ जागा जिंकण्याचा आणि मित्रपक्षांच्या मदतीने एखाददुसरी जागा जिंकण्याचा काँग्रेसला विश्वास आहे. हा पक्ष जेथे सत्तेवर आहे, त्या छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये पक्षाच्या जागा काही प्रमाणात वाढतील.

यावर्षी एप्रिल, जून व नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकांनंतर राज्यसभेत सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी बहुमताच्या जवळ जाईल. राज्यसभेतील ५१ जागा यावर्षी एप्रिलमध्ये, आणखी ५ जागा जूनमध्ये, तर ११ जागा नोव्हेंबरमध्ये रिकाम्या होणार आहेत.

मोतीलाल व्होरा, मधुसूदन मिस्त्री, कुमारी सेलजा, दिग्विजय सिंह, बी.के. हरिप्रसाद आणि राजीव गौडा यांसारख्या काँग्रेसच्या राज्यसभेतील ज्येष्ठ नेत्यांचा कार्यकाळ एप्रिल व जूनमध्ये संपत आहे. यापैकी व्होरा, सेलजा व दिग्विजय यांना पक्ष पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

उत्तराखंड व उत्तर प्रदेश येथे सत्ताधारी भाजपचे संख्याबळ वाढणे निश्चित असल्याने काँग्रेसचे राज बब्बर व पी.एल. पुनिया यांना पुन्हा संधी मिळणे कठीण आहे. यावर्षी नोव्हेंबरमध्ये उत्तराखंडमधील १, तर उत्तर प्रदेशातील १० जागा रिक्त होणार आहेत.

20

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Just Now!
X