24 October 2020

News Flash

नन बलात्कार प्रकरणातील आरोपी बिशप फ्रँको मुलक्कलला अटक

ननवरील बलात्कार प्रकरणात केरळ पोलिसांनी शुक्रवारी बिशप फ्रँको मुलक्कल यांना अटक केली. २०१४ ते २०१६ या दोन वर्षात ननवर बलात्कार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

बिशप फ्रँको मुलक्कल

ननवरील बलात्कार प्रकरणात केरळ पोलिसांनी शुक्रवारी बिशप फ्रँको मुलक्कल यांना अटक केली. २०१४ ते २०१६ या दोन वर्षात ननवर बलात्कार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. इंडिया टुडेने त्यांच्या अटकेचे वृत्त दिले आहे. मागच्या दोन दिवसांपासून मुलक्कल यांची कसून चौकशी सुरु होती. त्यांच्या अटकेसंबंधी अधिकृत घोषणा नंतर करण्यात येईल. ननवरील बलात्कार प्रकरणात अटक झालेले फ्रँको मुलक्कल भारतातील पहिले बिशप आहेत.

कोचीमध्ये शुक्रवारी दुपारी त्यांना अटक करण्यात आली. बिशप फ्रँको मुलक्कल यांची व्हॅटिकनने जालंधरमध्ये नियुक्ती केली होती. केरळच्या अधिकृत दौऱ्यावर असताना ननवर बलात्कार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. बिशप फ्रँको मुलक्कल यांना व्हॅटिकनने गुरुवारी प्रमुखपदावरुन हटवले. दरम्यान, बिशम फ्रँको मुलक्कल यांनी व्हॅटिकनकडे आपल्याला जबाबदाऱ्यांतून मुक्त करण्याची विनंती केली होती. त्यांनी पोप फ्रान्सिस यांना पत्र लिहून काही काळासाठी पदमुक्त करण्याची परवानगी मागितली होती. यामागे त्यांनी खटल्याचा हवाला दिला होता. त्यांनी पत्रात लिहीले होते की, आपल्याविरोधात काही आरोपांची चौकशी सुरु आहे, पोलिसांच्या या चौकशीला सहकार्य देण्यासाठी आपल्याला पदमुक्त करण्यात यावे. बिशपला अटक करण्याआधी पोलिसांनी बलात्काराचा आरोप करणाऱ्या ननची नव्याने जबानी नोंदवून घेतली.

सलग तीन दिवसांच्या चौकशीनंतर पोलिसांनी बिशप मुलक्कलला अटक केली. बिशप मुलक्कलने त्याच्यावरचे आरोप फेटाळून लावले आहेत. ५ मे २०१४ रोजी मी कुराविलानगड येथील कॉन्वेंटमध्ये थांबलो नव्हतो असा दावा त्यांनी केला आहे. याच दिवशी ननने तिच्यावर पहिल्यांदा बलात्कार झाल्याचा आरोप केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2018 6:36 pm

Web Title: nun rape case bishop franco mulakkal arrested
टॅग Kerala
Next Stories
1 ‘जेएनयू’त सर्जिकल स्ट्राइक दिवस साजरा होणार की नाही ?, कुलगुरू म्हणतात…
2 रशियाकडून एस-४०० मिसाइल सिस्टिम खरेदी करण्यापासून अमेरिका भारताला रोखणार ?
3 भारताकडून पाकिस्तानसोबत चर्चा रद्द, जवानांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर चर्चेस नकार
Just Now!
X