27 January 2021

News Flash

भय इथले संपत नाही… लस घेतल्यानंतरही झाला करोनाचा संसर्ग; डॉक्टरही संभ्रमात

डिसेंबरमध्ये घेतली होती करोनाची लस आणि जानेवारीत निघाला करोना पॉझिटिव्ह

(मूळ फोटो रॉयटर्सवरुन साभार)

फायजरची करोना लस घेतल्यानंतर एका महिन्याच्या आत आरोग्य कर्मचाऱ्याला करोनाचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार लंडनमध्ये समोर आला आहे. डेविड लॉन्गडन असं या आरोग्य कर्मचाऱ्याचं नाव आहे. डेविड साऊथ वेल्स येथील ब्रिजेंडीमधील प्रिंसेज ऑफ वेल्स रुग्णालयामध्ये कार्यरत आहे. डेविडने दिलेल्या माहितीनुसार त्याने आठ डिसेंबर रोजी फायजरच्या लसीचा पहिला डोस घेतला होता. मात्र करोनाची लस घेतल्यानंतरही आपल्याला करोनाचा संसर्ग झाल्याचे डेविडने म्हटलं आहे. डेविडचे करोना रिपॉर्ट पॉझिटिव्ह आले असून यामुळे डॉक्टरही गोंधळात पडले आहेत.

डेविडला फायजरच्या लसीचा दुसरा डोस पाच जानेवारी रोजी देणं अपेक्षित होतं. मात्र सरकारने ऐनवेळी नियमांमध्ये बदल केला. देशातील जास्तीत जास्त लोकांना करोनाची पहिली लस देण्यासाठी पहिल्या टप्प्यात लसीकरण करण्यात आलेल्यांना दुसऱ्या टप्प्यातील लस देण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली. सध्या डेविडला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. डॉक्टर सध्या डेविडला करोना कसा झाला याचा तपास करत आहेत. करोनाची लस घेतल्यानंतरही डेविडला करोनाचा संसर्ग कसा झाला या प्रश्नाचं उत्तर शोधून काढण्याचं आव्हानात्मक काम डॉक्टरांच्या टीमसमोर आहे. मी लसीचा पहिला डोस घेतल्यानंतरही सरकारी कारभारामुळे करोनाचा संसर्ग झाला यावरुन सरकारला पहिल्या फळीत काम करणाऱ्या करोना योद्ध्यांची किती चिंता आहे हे दिसून येत असल्याचे सांगत डेविडने आपली नाराजी व्यक्त केली आहे. डेविडने डेली मेलला दिलेल्या माहितीनुसार तो मागील अनेक दिवसांपासून आप्तकालीन विभागामध्ये काम करत होता. या विभागामध्ये रोज अनेक करोना रुग्णांना दाखल करण्यात येत आहे. डेविड ज्या ब्रिजेंडीमधील रुग्णालयात काम करतोय तो प्रदेश करोनाचा सर्वाधिक संसर्ग झालेल्या प्रदेशांपैकी एक आहे.

मला माझ्या कुटुंबाची चिंता वाटत असल्याचेही डेविडने डेली मेलशी बोलताना म्हटलं आहे. माझ्यामुळे कुटुंबातील कोणाला करोनाचा संसर्ग तर झाला नसेल ना अशी भीती आपल्याला वाटत असल्याचं डेविड सांगतो. माझ्या पार्टनरला मधुमेहाचा त्रास असल्याने तिला करोनाचा संसर्ग झाल्यास जास्त त्रास सहन करावा लागू शकतो, असंही डेविड म्हणाला. करोनाची लस घेतल्यानंतर मला करोनाचा संसर्ग होणार नाही असा विश्वास होता. त्यामुळे मी लस घेण्यापूर्वी ज्या पद्धतीची खबरदारी घ्यायचो ती सुद्धा फार घेत नव्हतो अशी कबुलीही डेविडने दिली.

डेविडची प्रकृती सध्या स्थिर आहे. सध्या डेव्हिडला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. मला डोकेदुखी आणि सर्दीचा त्रास होता असंही डेविडने स्पष्ट केलं आहे. तीन दिवसांपासून मला थकवा जाणवत असल्याने मी करोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला आणि चाचणीचा निकाल पॉझिटिव्ह आला अशी माहिती डेविडने दिली. या प्रकरणामुळे करोना लसीकरणाच्या टप्प्यामधील तारखा आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करणं गरजेचं असल्याचं मत आता समाज माध्यमांमध्ये उमटताना दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2021 3:54 pm

Web Title: nurse catches covid after his second vaccination was postponed when government changed rules scsg 91
टॅग Coronavirus
Next Stories
1 करोना लस: “काही मुस्लिमांचा भारतीय वैज्ञानिकांवर विश्वास नाही, त्यांनी पाकिस्तानात जावं”
2 Farm Laws: अचानक सुप्रीम कोर्टाला इतकी तत्परता कुठून आली? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचा सवाल
3 ओलींचा यू-टर्न… चीनला इशारा देत म्हणाले, “भारत आणि नेपाळ…”
Just Now!
X