News Flash

एन. व्ही. रमण भारताचे नवे सरन्यायाधीश

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिली पदाची शपथ

सौजन्य- ANI Twitter

एन. व्ही. रमण यांची भारताचे ४८ वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पदाची शपथ दिली. करोनामुळे शपथविधी सोहळ्यात नियमांची काटेकोरपणे अमलबजावणी करण्यात आली. सरन्यायाधीश एसए बोबडे यांचा कार्यकाळ संपल्याने उत्तराधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी सरन्यायाधीस शरद बोबडे यांनी रमण यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या नावाला मंजुरी दिली होती.

सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांचा कार्यकाळ २६ ऑगस्ट २०२२ रोजीपर्यंत असणार आहे. सोळा महिने रमण सरन्यायाधीशपदी असणार आहेत. रमण आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे पहिले न्यायाधीश आहेत, ते सरन्यायाधीश या पदावर गेले आहेत. २७ जून २००० साली त्यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली होती. १० मार्च २०१३ ते २० मे २०१३ या कालावधीत त्यांनी आंध्र प्रदेश उच्चन्यायालयाच्या कार्यवाहक मुख्य न्यायाधीश पदाचं काम पाहिलं आहे.

अरेरे! नाशिक दुर्घटनेची दिल्लीत पुनरावृत्ती; २० रुग्णांचा करुण अंत

६४ वर्षीय रमण यांचा जन्म आंध्र प्रदेशातील पोन्नावरम गावातील एका शेतकरी कुटुंबात झालेला आहे. पोन्नावरम हे गाव आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यात येते. रमण यांनी १० फेब्रुवारी १९८३ पासून आपल्याला वकिलीला सुरूवात केली. रमण यांचं बी.एस्सी, बी.एल. शिक्षण झालेलं असून, संविधान आणि फौजदारी आणि आंतरराज्य नदी कायद्यांमध्ये त्यांनी स्पेशलायझेशन केलेलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2021 12:12 pm

Web Title: nv raman take oath of new cji by president ramnath kovind rmt 84
टॅग : Supreme Court
Next Stories
1 कुख्यात गँगस्टर छोटा राजनला करोनाची लागण
2 अरेरे! नाशिक दुर्घटनेची दिल्लीत पुनरावृत्ती; २५ रुग्णांचा करुण अंत
3 मृत्यूचं थैमान थांबेना! २४ तासांत २,६२४ जणांनी करोनामुळे गमावले प्राण
Just Now!
X