ओबामा प्रशासनाचे स्पष्टीकरण
पाकिस्तानला दहशवाद विरोधी मोहिमांसाठी आर्थिक व लष्करी मदत देण्यात येत आहे, असे स्पष्टीकरण ओबामा प्रशासनाने केले आहे. अमेरिकी काँग्रेस व सिनेटच्या सदस्यांनी पाकिस्तानला आठ एफ १६ विमाने व इतर मदत देण्याचे थांबवावी अशी मागणी केली होती, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे उप प्रवक्ते मार्क टोनर यांनी सांगितले, की अमेरिका पाकिस्तानला दहशतवादाविरोधात लढण्यासाठी मदत करीत आहे. दहशतवादविरोधी मोहिमांमुळे अतिरेक्यांचे खच्चीकरण करणे शक्य आहे व त्यासाठी पाकिस्तानला ही मदत दिली जात आहे.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांना सिनेटर बॉब कॉर्कर यांनी एक पत्र पाठवून असे म्हटले होते, की पाकिस्तानला एफ १६ विमानांची विक्री करू नये, कारण हक्कानी नेटवर्क व इतर दहशतवादी संघटनांना पाकिस्तानमध्ये मोकळे रान देण्यात आले आहे.
टोनर यांनी मात्र मदत देण्याचे समर्थन केले असून, पाकिस्तानात दहशतवाद जास्त आहे, त्यामुळे त्याचा सामना करण्यासाठी त्या देशाला मदत देणे गरजेचे आहे. स्थिर व सुरक्षित अफगाणिस्तासाठी पाकिस्तानचा पाठिंबा घेणे आवश्यक आहे. पाकिस्तानने दहशतवादाच्या विरोधात अनेक मोहिमा राबवल्या आहेत. अधिसूचना अजून काढण्यात आलेली नाही, पण सुरक्षेसाठी पाकिस्तानला मदत करणे गरेजेचे आहे.