09 March 2021

News Flash

ओबामा-पुतीन भेटणार

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाली असून दोन जागतिक परिषदांच्या निमित्ताने उभय नेत्यांनी परस्परांशी थेट चर्चा करण्याचा निर्णय

| May 1, 2013 01:35 am

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाली असून दोन जागतिक परिषदांच्या निमित्ताने उभय नेत्यांनी परस्परांशी थेट चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. पुतीन यांचे परराष्ट्रधोरणविषयक सहायक युरी उशॉकोव्ह यांनी सांगितले की, जी २० देशांची शिखर परिषद रशियात सेंट पीटर्सबर्ग येथे सप्टेंबरच्या सुमारास होत आहे. त्यावेळी भेटण्याचा निर्णय या चर्चेत झाला. तसेच त्याआधी १७-१८ जूनला उत्तर आर्यलडमध्ये जी-८ समूहाची परिषद आहे, तेथेही चर्चा करण्याचे दोघांनी ठरविले आहे. भेटीच्या तारखांचा निश्चित तपशील मात्र त्यांनी दिला नाही. सिरिया प्रश्नावर सहकार्य वाढविण्यासंबंधात तसेच दहशतवादविरोधी लढय़ासंबंधात उभय नेत्यांमध्ये काही करार अपेक्षित आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2013 1:35 am

Web Title: obama calls up putin second time in a fortnight
Next Stories
1 २०० अतिरेकी घुसखोरीसाठी सज्ज ; लष्कराची माहिती
2 लखनौ विद्यापीठाच्या कुलगुरूपदी सर्जेराव निमसे
3 राजकारण्यांच्या आदेशाचे पालन करू नका – सुप्रीम कोर्टाने सीबीआयला फटकारले
Just Now!
X