अमेरिकेच्या संरक्षणमंत्रिपदावर अ‍ॅशटन कार्टर यांची नेमणूक आता निश्चित झाली आहे. त्यांच्या नामांकनाचा प्रस्ताव अध्यक्ष ओबामा यांनी पाठवला असून त्याबाबतची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
६० वर्षांचे कार्टर हे ओबामा यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. याआधीही त्यांनी ओबामा प्रशासनात विविध पदांवर काम केले आहे. याआधी, ते संरक्षण विभागाचे उपमंत्री होते. विशेष म्हणजे, कार्टर हे भारत समर्थक म्हणून ओळखले जातात.