डेमॉक्रॅटिक पक्षाच्या देणगीदारांनी अध्यक्षपदासाठी आघाडीवर असलेल्या हिलरी क्लिंटन यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केले आहे.
डेमॉक्रॅटिक पक्षासाठी निधी गोळा करण्यासाठी गेल्या आठवडय़ात टेक्ससमधील ऑस्टिन येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ओबामांनी स्पष्ट शब्दांत हे आवाहन केले. मात्र, दुसरे उमेदवार सँडर्स यांनी या स्पर्धेबाहेर व्हावे असे त्यांनी उघडपणे सुचवले नाही, असे ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्तात म्हटले आहे.
प्राथमिक स्पर्धेत सँडर्स हे हिलरी यांच्या खूप मागे असून १५ मार्चला झालेल्या लढतीत हिलरींनी फ्लोरिडा, इलिनॉईस, उत्तर कॅरोलिना, ओहिओ आणि मिसौरी या राज्यांमध्ये आघाडी मिळवली होती.