02 June 2020

News Flash

वाहतुकीच्या सम-विषम प्रयोगाची ब्ल्यू प्रिंट जाहीर

नियमाचे उल्लंघन करणाऱ्यास दोन हजार रुपयापर्यंत दंड.

१ जानेवारीपासून एक दिवस आड वाहने रस्त्यावर धावणार.

दिल्लीत १ जानेवारीवासून कठोर अंमलबजावणी
दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाशी चार हात करण्यासाठी धाडसी निर्णय घेणाऱ्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘सम-विषम’ नियमाची ‘ब्ल्यू प्रिंट’ सादर केली. नववर्षांत दिल्लीकरांना शिस्तीचे धडे देणारा हा उपक्रम १ ते १५ जानेवारीदरम्यान प्रायोगिक तत्त्वावर राबविला जाणार आहे. या प्रयोगाच्या यशापयशाची सारी जबाबदारी सरकार व नागरिकांवर असल्याची भावना केजरीवाल यांनी व्यक्त केली. राष्ट्रपती व पंतप्रधानांसह सर्वच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना सम-विषम नियमातून सूट देण्यात आली आहे. मात्र सामान्य नागरिकांनी नियम मोडल्यास त्यांना दोन हजार रुपये दंड भरावा लागेल. दिल्ली सरकारच्या या अभिनव प्रयोगावर सर्वच स्तरांतून उलट-सुलट प्रतिक्रिया उमटल्या असल्या तरी सामान्य नागरिकांमध्ये मात्र उत्साह आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत ‘सम-विषम’ प्रयोगाच्या नियमांची माहिती दिली. सोमवारी
(दि. २८) या नियमाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल.

असा असेल प्रयोग
* १ जानेवारीपासून एक दिवस आड वाहने रस्त्यावर धावणार. सर्व प्रकारच्या चारचाकी वाहनांचा समावेश. वाहनाचा अखेरचा क्रमांक सम असल्यास सम तारखेला तर विषम असल्यास विषम तारखेला वाहन रस्त्यावर आणण्यास परवानगी. उदा. १,३,५,७,९,० असल्यास विषम तर २,४,६,८ असल्यास सम तारखेला वाहन रस्त्यावर आणता येईल. १५ जानेवारीपर्यंत प्रायोगिक तत्त्वावर राबविणार. सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत नियम लागू राहणार.
* सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांना सूट. मात्र ‘इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड’ चे स्टिकर गाडीवर असणे आवश्यक.
* १२ वर्षांच्या मुलासह वाहन चालविणाऱ्या महिलांना सूट. केवळ महिलाच असलेल्या कारलादेखील सूट. परंतु पुरुषसोबत असल्यास दंड.
* नियमाचे उल्लंघन करणाऱ्यास दोन हजार रुपयापर्यंत दंड.
* वाहनतळ व्यवस्थापकांना सम तारखेला सम तर विषम तारखेला विषम वाहनेच उभी करण्याची सूचना
* दहा हजार नव्या ऑटोंची नोंदणी. दिल्लीत सर्व ऑटो सीएनजीवर असल्याने प्रदूषणाची समस्येत भर पडणार नसल्याचा सरकारचा दावा.
* येत्या ३० डिसेंबरला दिल्लीतील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रदूषणमुक्त दिल्ली घडविण्यासाठी शपथ दिली जाणार. याशिवाय त्यांच्यामार्फत त्यांच्या पालकांना ‘सम-विषम’ नियम पाळण्याचा संदेश दिला जाईल.
* राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्षा, केंद्रीय मंत्री तसेच सर्व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांना सूट. केजरीवाल व त्यांचे मंत्रिमंडळ या नियमातून सूट घेणार नाहीत.
* रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशमन दलाचे वाहन, कैद्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना सूट

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2015 1:14 am

Web Title: odd even traffic plan blueprint published
Next Stories
1 आयसिसचा प्रभाव प्रभाव कमी करण्यात सरकारला यश -पर्रिकर
2 दादरी आरोपपत्रात भाजप नेत्याचा मुलगा
3 राजकीय हेतूने काँग्रेसचे जेटलींवर आरोप
Just Now!
X