News Flash

कंधमाळ लोकसभा पोटनिवडणूक प्रत्युशा राजेश्वरी सिंग यांना उमेदवारी

ओदिशातील कंधमाळ लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी बीजेडीने माजी खासदार हेमेंद्र सिंग यांच्या पत्नी प्रत्युशा राजेश्वरी सिंग यांना पक्षातर्फे उमेदवारी दिली आहे.

| September 24, 2014 12:01 pm

ओदिशातील कंधमाळ लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी बीजेडीने माजी खासदार हेमेंद्र सिंग यांच्या पत्नी प्रत्युशा राजेश्वरी सिंग यांना पक्षातर्फे उमेदवारी दिली आहे. माजी खासदार हेमेंद्र सिंग यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती.
हेमेंद्र सिंग यांचा मतदारसंघात चांगला प्रभाव होता. त्यांच्या पत्नी कंधमाळमधील जनतेसाठी उत्तम कार्य करतील आणि आपल्या पतीप्रमाणेच मतदारसंघात काम करतील, असा विश्वास ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी व्यक्त केला. नवीन पटनाईक यांनी आपल्यावर विश्वास दाखविल्याबद्दल प्रत्युशा राजेश्वरी सिंग यांनी त्यांचे आभार मानले आहेत. पतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करू, असे राजेश्वरी सिंग म्हणाल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2014 12:01 pm

Web Title: odisha cm naveen patnaik announces pratyusha rajeshwari as bjd candidate for kandhamal by poll
टॅग : Naveen Patnaik
Next Stories
1 मंगळयानाचा संक्षिप्त प्रवास
2 मंगळाला ‘मॉम’ मिळाली – नरेंद्र मोदी
3 २१४ कोळसा खाणींचे वाटप सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
Just Now!
X