News Flash

Corona Crisis: ओडिशात भटक्या जनावरांच्या जेवणासाठी ६० लाखांचा निधी; मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची घोषणा

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत

करोना संकटात ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक धडाडीने निर्णय घेत आहेत. आता मुख्यमंत्री नवीन पटनायक भटक्या जनावरांसाठी पुढे सरसावले आहेत. करोना काळात उपासमार होत असलेल्या भटक्या जनावरांच्या अन्नसाठी पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून त्यांनी ६० लाख रुपये मंजूर केले आहेत. हा निधी ५ महानगरपालिका, ४८ नगरपालिका आणि ६१ अधिसूचित क्षेत्र परिषदेत देण्यात येणार आहे. यामुळे करोना काळात उपासमार होत असलेल्या भटक्या जनावरांची भूक भागणार आहे.

स्वच्छ कारभार आणि ग्रामीण भागात लोकांपर्यंत सरकारी सेवा पोहोचतात की नाही यावर बारीक लक्ष ठेवल्यानेच नवीन पटनायक हे यशस्वी झाले आहेत. त्यांच्या कामामुळे जनतेनं कायमच त्यांच्यावर प्रेम केलं. त्यामुळे इतकी वर्षे ते मुख्यमंत्रिपदावर विराजमान आहेत. आता भटक्या जनावरांसाठी त्यांनी घेतलेल्या निर्णयाचं कौतुक होत आहे.

७५ वर्षीय नवीन पटनायक मुख्यमंत्रिपदावर गेल्या २१ वर्षांपासून विराजमान आहेत, देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून त्यांची गणना केली जाते. सर्वात जास्त काळ मुख्यमंत्रिपदावर राहिल्याने त्यांच्या नावावर विक्रम नोंदवला गेला आहे. नवीन पटनायक यांनी वडिलांच्या निधनानंतर १९९७ साली बीजू जनता दल पक्षाची स्थापना केली. त्यानंतर राज्यात सत्ता खेचून आणली. त्यानी पहिल्यांदा भाजपासोबत एकत्रितपणे निवडणूक लढवली. त्यानंतर २००९ पासून आतापर्यंत स्वत:च्या ताकदीवर निवडणूक लढत आहेत. २०१४ आणि २०१९ लोकसभेच्या निवडणुकीतही बीजू जनता दलने चांगली कामगिरी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2021 3:53 pm

Web Title: odisha cm naveen patnaik has sanctioned rs 60 lakhs from cmrf to feed stray animals rmt 84
टॅग : Corona
Next Stories
1 “दिल्लीतले मंत्री,आमदारच औषधं आणि ऑक्सिजनचा काळाबाजार करतायत”; दिल्लीच्या भाजपाध्यक्षांचा गंभीर आरोप
2 Covid Crisis : केंद्रानं रुग्णसंख्येनुसार राज्यांची केली ३ प्रकारात वर्गवारी!
3 कोण आहेत आसामचे नवे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा?
Just Now!
X