News Flash

Coronavirus: आरोग्यविभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळणार ४ महिन्यांचा अ‍ॅडव्हान्स पगार

करोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची काळजी घेणं सध्याच्या परिस्थितीत महत्वाचं काम आहे.

Coronavirus: आरोग्यविभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळणार ४ महिन्यांचा अ‍ॅडव्हान्स पगार
संग्रहित छायाचित्र

करोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची काळजी घेणं सध्याच्या परिस्थितीत अत्यंत महत्वाचं काम आहे. याची पूरेपूर जाणीव असल्यानेच ओडिशातील नवीन पटनाईक सरकारने आरोग्यविभागाच्या कर्माचाऱ्यांना ४ महिन्यांचा अॅडव्हान पगार देण्याचा निर्णय घेतला आहे.

करोना विषाणूचा देशभरात वेगाने फैलाव होत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आजवर देशात ११ करोनाग्रस्तांचे मृत्यू झाले आहेत. राजधानी दिल्लीत दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर तामिळनाडूत देखील एक मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. देशभरात करोनाग्रस्तांचा आकडा हा ५६२वर पोहोचला आहे.

या पार्श्वभूमीवर करोनाच्या वाढत्या संकटाचा अंदाज घेऊन ओडिशा सरकारने आपले अनेक जिल्हे यापूर्वीच लॉकडाऊन केले होते. त्यानंतर मंगळवारी मध्य रात्रीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2020 6:48 pm

Web Title: odisha cm naveen patnaik sanctions 4 month advance salary payment to health care personnel aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Caronavirus: …म्हणून आम्ही जगभरामध्ये प्रिमियम कंटेंट मोफत देत आहोत; ‘पॉर्न हब’ची घोषणा
2 ‘बुलाती है मगर जाने का नहीं’ म्हणणारे शायर राहत इंदौरी करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी आले धावून
3 ‘राक्षसी विचारसरणी’; काबूल गुरुद्वारावरील हल्ल्याचा भारताकडून निषेध
Just Now!
X