RT-PCR test rate : विविध राज्यांमध्ये करोना चाचणीच्या दरांमध्ये कपात करण्यात आली आहे. जणू राज्य सरकारमध्ये करोना चाचणींचे दर स्वस्त करण्याची एकप्रकारे शर्यतच लागली आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि गुजरातनंतर ओदिशानेही आपल्या करोना चाचणीच्या किंमतीत कपात केली आहे. ओदिशामध्ये कोविड चाचणी (RT-PCR test) फक्त ४०० रुपयांमध्ये होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

कोविड चाचणी (RT-PCR test rate) आतापर्यंत दोन हजार ते २४०० रुपयांच्या किंमती होती. दिल्ली सरकारनं मात्र खासगी रुग्णालयातील कोविड चाचणीचा दर ८०० रुपये केला आहे. दिल्लीनंतर राजस्थान आणि गुजरात सरकारनेही खासगी लॅबमध्ये करोना चाचणीचे दर कपात करण्याची घोषणा केली. मंगळवारी उत्तरप्रदेश सरकारनं आरटी-पीसीआर चाचणीचे दर कपात करत ७०० रुपये करण्यात आलं आहे.

ओदिशा सरकारनं या सर्वांना पिछाडीवर सोडत आतापर्यंतची सर्वात स्वस्त करोना चाचणीची घोषणा केली आहे. ओदिशामध्ये आता करोनाच्या आरटी-पीसीआर चाचणीला फक्त ४०० रुपये मोजावे लागतील. ओदिशा सरकारनं राज्यातील सर्व खासगी लॅबधारकांना सूटना नोटीस पाठवण्यात आली आहे.

दिल्ली, गुजरातमध्ये प्रत्येकी ८०० रुपयांना करोना चाचणीचा दर राज्य सरकारनं केला आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये करोना चाचणीचे दर सातशे रुपये करण्यात आले आहेत.