News Flash

…आणि वाहतूक पोलिसांनी ट्रक चालकाला ठोठावला ८६ हजार ५०० रुपयांचा दंड

पाच तास पोलिसांशी चर्चा केल्यानंतर दंडाची रक्कम १६ हजार ५०० रुपयांनी कमी करण्यात आली

८६ हजार ५०० रुपयांचा दंड (फोटो सौजन्य: हिंदुस्तान टाइम्स)

देशात १ सप्टेंबरपासून नवीन मोटर आणि वाहन कायदा लागू झाला आहे. या नवीन कायद्यानुसार वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात दंड करण्यात येत आहे. सध्या देशभरामध्ये याच नियमांची चर्चा आहे. कुठे गाडीच्या किंमतीपेक्षा जास्त दंड ठोठावण्यात आला तर कुठे दोन महिन्यांच्या पगाराइतका दंड ठोठावण्यात आला, अशा अनेक बातम्या मागील आठवडाभरात समोर आल्या आहेत. मात्र या सर्व बातम्यांमधील दंडाच्या रकमेचा विक्रम मोडणारा दंड ओदिशामधील एका ट्रकचालकाला ठोठावण्यात आला आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले म्हणून या ट्रक चालकाला चक्क ८६ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. संभलपूर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ही कारवाई केली आहे. तर ज्या चालकावर कारवाई करण्यात आली त्याचे नाव अशोक जाधव असल्याचे समजते.

जाधव चालवत असलेल्या ट्रकचा क्रमांक एनएल ०१ जी १४७० आहे. हा ट्रक नागालँडमधील आहे. मात्र या चालकाने पोलिसांबरोबर पाच तास हुज्जत घालती आणि काही कागदपत्र सादर केल्यानंतर त्याला ७० हजारांचा दंड भरण्यास सांगण्यात आले. ३ सप्टेंबर रोजी हा सर्व प्रकार घडला. या चालकाने तीन दिवसानंतर दंडाची रक्कम आरटीओ कार्यालयात भरल्यानंतर ट्रक त्याच्या ताब्य़ात देण्यात आला. या इतक्या मोठ्या दंडाच्या पावतीचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.

…म्हणून इतका दंड

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनधिकृतरित्या पुरेशी कागदपत्रे नसताना अवजड वाहनाचा चालक म्हणून काम केल्याप्रकरणी पाच हजार रुपये, परवाना नाही म्हणून पाच हजार रुपये, क्षमतेपेक्षा अधिक अवजड सामान वाहून नेत असल्याप्रकरणी ५६ हजार रुपये, ओव्हर डायमेंशन प्रोजेक्शनसाठी (क्षमतेपेक्षा अधिक आकाराचे सामान वाहून नेणे) २० हजार रुपये आणि कागपत्रांसंदर्भातील ५०० रुपये दंड या चालकाला लगावण्यात आला. हा ट्रक ओदिशाहून छत्तीसगडला जात होता. याच मार्गावर संभलपूर क्षेत्रातून जाताना ट्रकचालकावर ही कारवाई करण्यात आली. या ट्रकमधून जेसीबी क्रेनची वाहतूक केली जात होती. हा ट्रक नागालँडमधील बीएलए इंफ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मालकीचा असल्याचे समजते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2019 10:22 am

Web Title: odisha truck driver fined rs 86500 the highest in country under mv act scsg 91
Next Stories
1 व्हर्गिस कुरियन पुण्यतिथी विशेष: ‘टेस्ट ऑफ इंडिया’ला जगभरात घेऊन जाणारे धवलक्रांतीचे पितामह
2 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
3 मोदी सरकारने कोणत्या वृत्तपत्राला दिल्या ‘भरघोस’ जाहिराती?, ‘आरटीआय’मधून खुलासा
Just Now!
X